Balasaheb Thackeray : "उद्धव आणि नितीन गडकरींना...", 2011ला बाळासाहेब सेना-भाजप युतीबद्दल काय म्हणाले होते पाहा!

मुंबई तक

19 Nov 2024 (अपडेटेड: 19 Nov 2024, 08:30 AM)

उद्धव ठाकरेंच्या शिवसेने बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

बाळासाहेब ठाकरे भाजपवर नाराज होते?

point

2014 च्या निवडणुपूर्वी काय म्हणाले होते?

point

भाजवच्या नव्या पिढीबद्दल काय म्हणाले होते बाळासाहेब?

Uddhav Thackeray Shiv Sena Tweets Balasaheb Thackeray Video : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, कालच प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. तर उद्याच राज्यभर एकाच टप्प्यात या निवडणुकांचं मतदान आहे. अडीच वर्षांपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रादेशिक पक्षांमध्ये पडलेली फूट आणि त्यातून तयार झालेले दोन नवे पक्ष, याच मुद्द्याभोवती ही निवडणूक फिरतेय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं असा आरोप करत एकनाथ शिंदे यांनी वेगळा निर्णय घेतल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत होतं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून यावर बोललं जातं. मात्र आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेने याबद्दलचाच एका व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये एका मुलाखतीत बाळासाहेब ठाकरे हे भाजप आणि शिवसेना युतीच्या भवितव्याबद्दल बोलत होते.

हे वाचलं का?

 

हे ही वाचा >>Anil Deshmukh: मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख गंभीर जखमी, गाडीवर तुफान दगडफेक

 

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ करण्यात आला आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये बाळासाहेब ठाकरे भाजप आणि शिवसेना युतीच्या भवितव्याबद्दल बोलत आहेत. 28 मे 2011 ला घेतलेल्या या मुलाखतीत 2014 च्या विधानसभा निवडणुकीबद्दल प्रश्न विचारण्यात आल्याचं दिसतंय.

ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये काय म्हटलंय?

प्रश्न : तुम्ही भाजपच्या जवळ आहात? 

उत्तर : जवळ काय असतं? जवळ काही नसतं...

प्रश्न : तुमची युती आहे त्यांच्यासोबत... 

उत्तर : राजकारणात जवळ काही नसतं...

प्रश्न : विचारसरणीमुळे तुम्ही जवळ आहात?

उत्तर : आताच्या नव्या भाजपच्या पिढीसोबत नाही, 20 वर्षांपूर्वीच्या लोकांसोबत, ज्यामध्ये वाजपेयी, अडवानी हे लोक होते. 

आता माझ्यासमोर सगळे नवे लोक आहेत...

प्रश्न : विचारसरणीच्या माध्यमातून तुम्ही भाजप जवळ आहात का? 

उत्तर : राजकारणात विचारसरणी वगैरे नसते...

प्रश्न : शिवसेना-भाजप युतीला गृहीत धरलं जातंय? 2014 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपच्या युतीचं भवितव्य काय असेल? कारण तुम्ही सध्या भाजपजवळ असल्याचं दिसत नाहीये...

उत्तर : मी आजा जुना माणूस आहे, तुम्ही याबद्दल नव्या पिढीला विचारलं पाहिजे, जसे की उद्धव आणि नितीन गडकरी... ते हातात हात घेऊन पुढे जाऊ शकतात का...



 

    follow whatsapp