Indresh kumar : "अहंकारी झाले म्हणूनच 241 जागा मिळाल्या", RSS ची भाजपवर तोफ

मुंबई तक

14 Jun 2024 (अपडेटेड: 14 Jun 2024, 01:10 PM)

RSS Indresh Kumar : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने भाजपचे कान पिळताना दिसत आहे. मणिपूर हिंसाचार, विरोधी पक्ष मुद्द्यावरून सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुनावल्यानंतर संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी मोठे विधान केले आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजप नेतृत्वावर टीका.

आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांनी मोदी सरकारला सुनावले खडेबोल

follow google news

बातम्या हायलाइट

point

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भाजपवर टीका

point

आरएसएस नेते इंद्रेश कुमार यांनी सुनावले खडेबोल

point

"अहंकारी झाल्यामुळे भाजपला बहुमत मिळालं नाही"

Indresh Kumar News : 'अहंकारी झाला होतात, म्हणून 241 जागांच मिळाल्या', या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांच्या विधानाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. इंद्रेश कुमार यांनी थेट भाजपवरच हल्ला चढवला आहे. त्यामुळे आरएसएस आणि भाजप यांच्यात बिनसलं असल्याच्या चर्चेला आणखी हवा मिळाली आहे. (RSS national executive member Indresh Kumar attacks BJP on Lok Sabha election results)

हे वाचलं का?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात एका कार्यक्रमात केंद्र सरकारचे कान टोचले होते. मोहन भागवत म्हणाले होते की, 

"फक्त आपलं मत बरोबर आहे, इतर कोणाचं नाही या मानसिकतेतून बाहेर पडायला हवं. जो आपले कर्तव्य बजावताना शिष्टाचाराच्या मर्यादा पाळतो. ज्याला आपल्या कार्याचा अभिमान आहे; तरीही अलिप्त राहतो, जो अहंकाररहित असतो अशी व्यक्ती खरोखरच सेवक म्हणण्यास पात्र ठरतो."

हेही वाचा >> लोकसभेचा निकाल लागताच अजित पवारांच्या अडचणी वाढल्या!

त्यानंतर आता आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांनी भाजपला शेलक्या शब्दात सुनावले आहे. इंद्रेश कुमार हे १३ जून रोजी जयपूरमधील कानोटामध्ये रामरथ अयोध्या यात्रेच्या पूजन कार्यक्रमात बोलत होते.

हेही वाचा >> शिंदेच्या आमदाराचा महायुतीलाच घरचा आहेर 

"लोकशाही रामराज्याचे जनादेश बघा, ज्यांनी रामांची भक्ती केली, पण अहंकारी झाले. त्यांना 241 वर रोखलं. सर्वात मोठा पक्ष बनवलं, पण जितकी मते आणि ताकद मिळायला हवी होती, ती ईश्वराने अहंकारामुळे रोखली."

 

विरोधी इंडिया आघाडीबद्दल बोलताना इंद्रेश कुमार म्हणाले की, 

"ज्यांना रामाबद्दल कोणतीही श्रद्धा नाही. त्यांना सगळ्यांना 234 वर रोखलं. ज्यांनी रामाचा विरोध केला, त्यांच्यापैकी कुणालाही सत्ता दिली नाही. इतकंच नाही, तर त्या सगळ्यांना दुसऱ्या क्रमांकावर ठेवलं. ईश्वराचा न्याय खरा आणि आनंददायक आहे."

    follow whatsapp