'छत्रपतींच्या गादीचा सन्मान महायुतीने ठेवलाच नाही..', पवारांच्या शिलेदाराचा भाजपवर वार!

मुंबई तक

13 Apr 2024 (अपडेटेड: 13 Apr 2024, 05:14 PM)

Shashikant Shinde on Udayanraje Bhosale : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. अशा परिस्थिती काही जागांवरील जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

Mumbaitak
follow google news

Shashikant Shinde on Udayanraje Bhosale : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. अशा परिस्थिती काही जागांवरील जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर उदयनराजे यांनी त्यांचे नाव न घेता टीका केली होती. या टीकेला शशिकांत शिंदेंनीही प्रत्युत्तर दिले होते. 'निवडणुकीसाठी मी कोणाचे आव्हान समजत नाही. माझी तत्वाची लढाई आहे.लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जावे,' असे शिंदे म्हणाले होते. (Lok Sabha Election 2024 Mahayuti has not respected the thrones of Chhatrapati in Satara Shashikant Shinde's attack on BJP along with Udayanraje Bhosale)

हे वाचलं का?

यानंतर उदयनराजेंनी पुन्हा टीका करत म्हटलं होतं की, 'मतदारसंघात फिरणंसुद्धा शक्य होणार नाही. काही प्रकरणं आहेत ती आम्ही लवकरच पुढे आणणार आहोत.' यावर शशिकांत शिंदेंनीही पुन्हा प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांच्यात या टीका-टिप्पण्या कायम सुरूच आहे.

'उदयनराजेंची उमेदवारी जाहीर करताना इतका विलंब का? विचार करण्याचा भाग' - शशिकांत शिंदे

'छत्रपतींच्या गादींचा सन्मान महायुतीने ठेवलाच नाही. तो विचार त्यांनी करायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या मनाला हा प्रश्न विचारायला हवा. मी छत्रपतींच्या बाबत काही बोलणार नाही मात्र भाजप पक्षाचे उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर करताना इतका विलंब का लावला हा विचार करण्याचा भाग आहे.' असा प्रति टोला महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना व जिल्ह्यातील नेत्यांना लगावला आहे.

'उदयनराजेंशी माझा कोणताही वैचारिक वाद नाही उलट...'- शशिकांत शिंदे

'छत्रपती उदयनराजेंच्या बरोबर माझा कोणताही वैचारिक वाद नाही उलट राष्ट्रवादीमध्ये असताना तीन वेळा त्यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यासाठी सगळ्यात जास्त प्रचारामध्ये आघाडी माझीच होती. आताची लढाई ही महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्याच्या स्वाभिमानाची लढाई आहे. आताची लढाई ही लोकशाही टिकवण्याच्या दृष्टिकोनातून आहे. सातारा जिल्ह्याला व्हिजन देणारा खासदार जिल्ह्याच्या जनतेला पाहिजे. 

त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाने मला उमेदवारी जाहीर केलेली आहे. गेल्यावेळी उदयनराजे यांचा पराभव झाला त्यावेळी मंडळींनी का बरं त्यांचा सन्मान ठेवला नाही? त्यांच्या विरोधात देखील निवडणुका लढवल्या गेल्या त्यावेळी छत्रपतींचा सन्मान स्वाभिमान का आठवला नाही. 
स्वार्थासाठी छत्रपतींना विचारायचं आणि दुसऱ्या जिल्ह्यात छत्रपतींच्या गादीचा अवमान करायचा चुकीची विधान करायची राजकीय डावपेच असतात ते लोकांना लक्षात येतात.'

'राज्यातल्या महायुतीला मोठ्या प्रमाणात विरोध'!

पुढे शिंदे म्हणाले की, 'सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राची निवडणूक ही लोकांनी हातात घेतलेली आहे. राज्यातल्या महायुतीला मोठ्या प्रमाणात विरोध आहे आणि तो प्रत्यक्षात लोकांना मी भेटल्यानंतर लक्षात येतोय, त्याची जाणीव होते. लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात महायुतीच्या विरोधात संताप आहे मात्र शरद पवारांच्या बाबत मोठ्या प्रमाणात सहानुभूती आहे जिल्ह्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय आणि हा प्रतिसाद बघितल्यानंतर आगामी काळात देखील असाच प्रतिसाद टिकून राहिला तर नक्कीच महायुतीचा उमेदवार पराभूत होईल व शरद पवारांचा विचार सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये जनतेच्या मनामनात राहील.'

    follow whatsapp