PM Modi Mumbai: ठाकरे-पवार रडारवर.. PM मोदी मुंबईकरांना काय म्हणाले?

मुंबई तक

17 May 2024 (अपडेटेड: 17 May 2024, 09:47 PM)

Prime Minister Narendra Modi held a public meeting at Shivaji Park in Mumbai. At this time, Prime Minister Modi criticized Sharad Pawar and Uddhav Thackeray.

PM Modi Mumbai:  ठाकरे-पवार रडारवर.. PM मोदी मुंबईकरांना काय म्हणाले?

PM Modi Mumbai: ठाकरे-पवार रडारवर.. PM मोदी मुंबईकरांना काय म्हणाले?

follow google news

PM Modi: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 च्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप-शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. याच सभेत नरेंद्र मोदींनी ठाकरे आणि पवारांवर जोरदार हल्ला चढवला. (lok sabha election 2024 pm modi mumbai speech uddhav thackeray sharad pawar on the radar what did pm modi say to mumbaikars)

हे वाचलं का?

पाहा पंतप्रधान नरेंद्र नेमकं काय म्हणाले.. 

  • पंतप्रधान मोदी म्हणाले, "त्यांना राम मंदिरही अशक्य वाटत होते. जगाला हे स्वीकारावं लागेल की, भारताचे लोक विचारांशी इतके एकनिष्ठ होते की, एक स्वप्न घेऊन पाचशे वर्ष लढत राहिले. पाचशे वर्ष हा छोटा इतिहास नाही. अनेक पिढ्यांचा संघर्ष, लाखो लोकांचे बलिदान... आज रामलल्ला भव्य मंदिरात विराजमान आहेत."

 

  • "नैराश्याच्या गर्तेत डुबलेले ते लोक आहेत, ज्यांना ३७० कलम हटवणेही अशक्य वाटत होते. ३७० कलमांची भिंत मी स्मशानात पुरली आहे. स्वप्न पाहत आहेत की, ३७० पुन्हा लागू करणार. त्यांनी कान उघडे ठेवून ऐकावं. जगातील कोणतीही ताकद पुन्हा ३७० कलम आणू शकत नाही."

 

  • "आपला देश अनेक शतके बॉम्बस्फोटांनी रक्तबंबाळ होत राहिला. दहशतवादी हल्ल्यांनी भारतेचा ह्रदय चिरडून टाकलं जात होतं. मुंबईसारखी शहर हादरत राहायची. कुठे बेवारस वस्तू दिसली, तर पोलिसांना सांगा, हेच ऐकावं लागत होतं. दहा वर्ष झाले. ऐकलं का? बंद झालं की नाही? हे यांना अशक्य वाटतं होतं."

 

  • "देशाच्या संसदेने तीन तलाकला तलाक... तलाक... तलाक केलं. महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी ४० वर्षे वाट बघत राहिले. संसदेत चर्चा व्हायची. जे आज संविधानाला डोक्यावर घेऊन नाचत आहेत. त्यांनी संसदेत ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक फाडून टाकले. यांच्या छातावर बसून आरक्षण दिलं की नाही दिलं?"

 

हे ही वाचा>> Maharashtra Live : महाविकास आघाडी, महायुतीची मुंबईत सभा.. PM मोदीही हजर

 

  • "मोदीने १० वर्षात २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढून दाखवलं आहे. जे अशक्य वाटत होतं, ते शक्य झालं की नाही झालं. कुणी हे शक्य केलं? कोणती ताकद आहे, जिने हे केलं आहे. मोदी नाही, ही तुमच्या मतांची ताकद आहे. तिने हे केलं आहे."

 

  • "ज्यांना मुलांचं उज्ज्वल भविष्य हवं आहे. ज्यांना शांतता आणि सुरक्षा हवी आहे. विकासाच्या संधी हव्या आहेत. भारताचे मान उंचावी, असे ज्यांना वाटतं, त्यांनी घरातून बाहेर पडावं आणि मतदान करावं. माझा आग्रह आहे. मुंबईकरांकडे आलोय. आशीर्वाद मागायला आलोय. मतदान करण्यासाठी घरातून बाहेर पडताना स्मरण करा की, कधी काळी बॉम्बस्फोट व्हायचे. आज गर्वाने तुमची मुलगी सुरक्षित घरी परततीये."

 

  • "या लोकांनी जनादेश चोरून सरकार बनवले. महाराष्ट्राबद्दल बोलतोय. त्यावेळी यांनी विकासावरही आपली दुश्मनी काढली. बुलेट ट्रेन, मुंबई मेट्रो, जेएनपीटी कंटेनर टर्मिनल, मुंबईशी जोडलेला प्रत्येक प्रोजेक्ट यांनी लटकावला, अडकवला, भटकवला. हे मुंबईतील लोकांवर राग काढत होते."

 

हे ही वाचा>> Lok Sabha 2024 : "माझा मुलगा तुम्हाला सोपवतेय", सोनिया गांधी झाल्या भावूक

 

  • "मोदींचा एक संकल्प आहे. मोदी मुंबईला तिचा हक्क परत करण्यासाठी आले आहे. जगातील सर्वोत्तम पायाभूत सुविधा मुंबईला मिळत आहे. अटल सेतू, मुंबई मेट्रो विस्तार, मुंबई लोकल आधुनिकीकरण, नवी मुंबई विमानतळ बनत आहे, वंदे भारत ट्रेन धावत आहेत. आता तो दिवस दूर नाही, जेव्हा पहिली बुलेट ट्रेन मुंबईला मिळेल."

 

  • "आता मराठी इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय शिक्षण घेता येणार आहे. मी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की, निकालातील ऑपरेटिव्ह पार्ट प्रादेशिक भाषेत द्या. इंग्रजीचा झेंडा घेऊन काय फिरता. आज सर्वोच्च न्यायालयात मराठी भाषिक व्यक्तीला निकाल मराठीत हवा असेल, तर तो मिळेल."

 

  • "मोदीकडे दहा वर्षांचे रिपोर्ट कार्ड आणि ५० वर्षांचा रोडमॅप आहे. इंडी आघाडीकडे काय आहे? जितके लोक तितक्या बाता, जितके पक्ष तितक्या घोषणा, जितके पक्ष तितके पंतप्रधान. काँग्रेसच्या माओवादी घोषणापत्रात जितक्या घोषणा आहेत, त्यांचा हिशोब केला, तर देश दिवाळखोरीत जाईल. यांची नजर मंदिरातील सोन्यावर, महिलांच्या मंगळसूत्रावर आहे. यांना वारसा कराची कल्पना मांडली आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना संपत्ती देऊ शकणार नाही. तुमची अर्धी संपत्ती त्यांच्या सरकारला हिसकवायची आहे. तुमची संपत्ती त्यांच्या व्होटबँकेला... जे व्होट जिहाद करतात, त्यांना देण्याचा निर्णय केला आहे. यांचा हेतू खूप भयंकर आहे."

 

  • "काँग्रेससाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. दहा वर्षापूर्वी शेअर बाजार कुठे होता आणि आता कुठे आहे. छोटे छोटे गुंतवणूकदार शेअर बाजाराशी जोडले गेले आहेत. इंडी आघाडीपासून मी तुम्हाला सावध करतोय. माओवादी अर्थशास्त्र मुंबईची चाकंच ठप्प करतील." असं पंतप्रधान मोदी सभेत म्हणाले. 

 

    follow whatsapp