Lok Sabha Election Result 2024 : मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघाचे निकाल आता हाती आले आहेत. या निकालात ठाकरेंनी मुंबईतल्या तीनही जागा जिंकल्या आहेत. तर उत्तर मध्य मुंबईची एक जागा काँग्रेसने जिंकली आहे. अशाप्रकारे महाविकास आघाडीने मुंबईतील सहा पैकी 4 जागा जिंकल्या आहेत. तर मुंबई उत्तर मतदार संघ भाजपने जिंकला आहे, तर मुंबई उत्तर पश्चिम या मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उमेदवार रविद्र वायकर विजयी ठरले आहेत. तर ठाकरेंचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे मुंबईत सहा पैकी 2 जागावर महायुतीला यश मिळालं आहे.त्यामुळे महायुतीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. (lok sabha election result 2024 mumbai 6 lok sabha seath udhhav thackeray won 4 seat congrss and bjp won 1 seat lok sabha result)
ADVERTISEMENT
मुंबईच्या सहा मतदार संघाचा निकाल?
मुंबई उत्तर : मुंबई उत्तर या एकमेव मतदार संघात भाजप उमेदवार पियुष गोयल यांनी विजय मिळवला आहे. तर काँग्रेसचे भूषण पाटील यांचा पराभव झाला आहे.
मुंबई उत्तर मध्य : मुंबई उत्तर मध्य या मतदार संघात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा विजय झाला आहे. तर भाजप उमेदवार उज्वल निकम यांचा पराभव झाला आहे.
हे ही वाचा : Lok Sabha Election 2024 Result : ठाकरेंचा मुंबईत पहिला विजय, 'या' उमेदवाराने उधळला गुलाल
मुंबई ईशान्य : या मतदार संघात उद्धव ठाकरे यांचे उमेदवार संजय दिना पाटील विजयी झाले होते. तर भाजपचे मिहिर कोटेचा पराभूत झाले आहेत.
मुंबई उत्तर पश्चिम : या मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उमेदवार रविद्र वायकर विजयी ठरले आहेत. तर ठाकरेंचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव झाला आहे.
मुंबई दक्षिण : या मतदार संघात ठाकरेंचे उमेदवार अरविंद सावंत विजयी ठरले आहेत. तर शिंदेंच्या उमेदवार यामिनी जाधव यांचा पराभव झाला आहे.
मुंबई दक्षिण मध्य : या मतदार संघात ठाकरेंचे उमेदवार अनिल देसाई यांचा विजय झाला आहे. तर एकनाथ शिंदे यांचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा पराभव झाला आहे.
हे ही वाचा : Maharashtra Result: कोणता उमेदवार आघाडीवर, कोणता पिछाडीवर?
ठाकरेंना मुंबईत पाडण्यासाठी भाजपने जबरदस्त व्युहरचना आखली होती. ठाकरेंची मते फोडण्यासाठी आधी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेतले होते. त्यानंतर मराठी मतात फुट पाडण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेला सोबत घेतले होते. मात्र भाजपचे हे सगळे मनसुबे हाणून पाडत ठाकरेंनी मुंबईत मोठा विजय मिळवला आहे. ठाकरेंनी मुंबईतील सहा पैकी आता चार जागांवर जिंकल्या आहेत. तर एक जागा काँग्रेसने जिंकली आहे.ज्यामुळे महाविकास आघाडीने मुंबईत 4 जागांवर विजय मिळवला आहे. ठाकरेंसाठी हा मोठा विजय आहे.
ADVERTISEMENT