PM Modi : "काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा...", मोदींची पवार-ठाकरेंना 'ऑफर'

मुंबई तक

10 May 2024 (अपडेटेड: 10 May 2024, 02:10 PM)

PM Modi offers to Sharad pawar and uddhav Thackeray : नंदूरबारमधील सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एनडीएमध्ये सामील होण्याची ऑफर दिली.

पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे, शरद पवारांना दिली ऑफर.

उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी.

follow google news

बातम्या हायलाइट

point

पंतप्रधान मोदी यांची शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना ऑफर

point

ठाकरे, पवारांना एनडीएमध्ये सामील होण्याचे आवाहन

point

पंतप्रधान मोदींची नंदूरबारमध्ये प्रचारसभा

PM Modi on sharad Pawar, Uddhav Thackeray : शरद पवार यांनी एका मुलाखतीत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ जात असून, पुढील एक-दोन वर्षात काँग्रेस पक्ष विलिनीकरणासाठी चांगला पर्याय असल्याचे त्यांना वाटेल. कदाचित ते विलिनही होतील, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावर बोट ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना खुली ऑफर दिली आहे. (PM Modi offers to Sharad pawar and uddhav Thackeray that joined Eknath shinde and Ajit pawar)

हे वाचलं का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नंदूरबारमध्ये सभा झाली. हिना गावित यांच्या प्रचारार्थ मोदींची सभा झाली. या सभेत बोलताना मोदींनी नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी अशा शब्दात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना हिणवले. 

मोदी पवारांच्या विधानावर काय बोलले?

या सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "मित्रानों, महाराष्ट्रातील एक दिग्गज नेता आहेत. चाळीस-पन्नास वर्षांपासून ते अशाच उड्या मारत असतात. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते इतके चिंतित आहेत की, त्यांनी एक विधान केले. हे विधान त्यांनी मला ठामपणे वाटतं की, खूप लोकांशी चर्चा केल्यानंतर केलं असेल." 

हेही वाचा >> "दबाव होता... तुरुंगात जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय होते" 

"ते इतके हताश आणि निराश झाले आहेत की, त्यांना वाटतंय की जर चार जूननंतर राजकीय जीवनात, सार्वजनिक जीवन टिकून राहायचे असेल, तर छोट्या छोट्या राजकीय पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन झाले पाहिजे."

हेही वाचा >> बारामतीतील मतदानानंतर शरद पवारांबद्दल अजित पवारांची भाषा का बदलली? 

"याचा अर्थ ही जी नकली (खोटी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि ही जी नकली शिवसेना आहे; त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याची ठरवून टाकलं आहे. मी आता तुम्हाला सांगतोय की, जर चार जूननंतर काँग्रेसमध्ये जाऊन मरण्याऐवजी छाती उंचावून आमच्या अजितदादांसोबत आणि शिंदेजींसोबत या... मोठ्या अभिमानाने तुमची स्वप्न पूर्ण होतील."

शरद पवार मुलाखतीत नेमकं काय म्हणाले होते?

"पुढील दोन वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत येतील किंवा त्यातील काही पक्ष त्यांच्यासाठी चांगला पर्याय म्हणून काँग्रेसमध्ये विलीन होण्याबद्दलही विचार करतील", असे शरद पवार इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का?

या प्रश्नावर शरद पवार म्हणाले होते की, "काँग्रेस आणि आमच्यात (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) कोणताही फरक दिसत नाही, विचारधारेबाबत. आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारधारेतूनच येतो."

"मोदींशी जुळवून घेणे कठीण"

"सहकाऱ्यांशी बोलण्याशिवाय मी आताच काही सांगणार नाही. मी काही बोललं नाही पाहिजे. विचारधारेच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आम्ही त्यांच्या जवळ आहोत. रणनीतीबद्दल किंवा पुढील वाटचालीबद्दल कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल. मोदींसोबत जुळवून घेणे किंवा त्यांना स्वीकारणे कठीण आहे", असे विधानही शरद पवारांनी या मुलाखतीत केले होते.

 

    follow whatsapp