Prithviraj Chavan Lok Sabha election 2024 : सलग दहा वर्षे सत्तेत असलेले भाजपप्रणित एनडीए तिसऱ्यांदा सत्तेत येणार की विरोधी बाकांवर बसावं लागणार, याबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत. अशात राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निकालाबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. भाजपला पुन्हा बहुमत मिळणं कठीण असल्याचे सांगतानाच त्यांनी यामागची कारणेही सांगितली आहेत. (Prithviraj Chavan, Former chief minister of maharashtra has predicted that it will be difficult for BJP to get majority again)
ADVERTISEMENT
पृथ्वीराज चव्हाण यांनी 'लोकसत्ता' वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी भाजपला बहुमत मिळणे का कठीण आहे, याबद्दलची काही कारणेही सांगितली आहेत.
Lok Sabha Election 2024 : पृथ्वीराज चव्हाण यांनी निकालाबद्दल काय केली भविष्यवाणी?
चव्हाण म्हणाले की, "पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या घोषणा त्यांच्याच अंगलट आल्या आहेत. भाजपला साध्या बहुमताचा २७२ चा आकडा गाठणेही अवघड झालेले असून, केंद्रात सत्ताबदलाची शक्यता स्पष्टपणे दिसत आहे", असा दावा करतानाच "महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३२ ते ३५ जागा मिळण्याची शक्यता आहे", असे भाकित त्यांनी केले.
हेही वाचा >> "आमची चूक झाली", उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना फडणवीसांचं मोठं विधान
"भाजपला पुन्हा सत्ता मिळणे कठीण असल्याचे विविध राज्यांत आढावा घेताना मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट होते. देशात सध्या भाजपच्या विरोधात वातावरण अनुभवास येत आहे. महाराष्ट्रातही चित्र वेगळे नाही", असे चव्हाण म्हणाले.
अजित पवारांना एकही जागा मिळणार नाही -पृथ्वीराज चव्हाण
महाराष्ट्रातील लोकसभेच्या निकालाबद्दल बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "अजित पवार गटाची एकही जागा निवडून येणार नाही. शिंदे यांच्या तीन चार जागा निवडून येऊ शकतात. तर काँग्रेसचे १२ उमेदवार निवडून येण्याचा अंदाज आहे", असे भाकित त्यांनी केले.
हेही वाचा >> उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप, भाजप आमदाराने फोटोच केला शेअर!
"उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना लोकांची सहानुभूती आहे. त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल. भाजपच्या विरोधात महागाई, बेरोजगारी, आर्थिक गैरव्यवहार, नैतिक भ्रष्टाचार आणि शेवटचा मुद्दा संविधान बचाव हे मुद्दे या निवडणुकीत प्रभावी ठरत आहे. मोदी या पाचही मुद्द्यांवर स्पष्टीकरण देऊ शकत नाही", अशी प्रमुख कारणे भाजपला अडचणीत ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
इंडिया आघाडीला किती मिळणार जागा? चव्हाणांचा अंदाज काय?
पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपला २७२ जागा मिळणे अवघड असल्याचे सांगतानाच इंडिया आघाडीला किती जागा मिळतील, याबद्दलही त्यांचा अंदाज सांगितला आहे.
हेही वाचा >> 'अबकी बार 400 पार' भाजपवरचं झालं बुमरँग!
"केंद्रात सत्ताबदल होणार, असे चित्र आहे. इंडिया आघाडीला २४० ते २६० जागा मिळतील. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या जागा वाढतील, असे एकही राज्य नाही. अब की बार चारसो पार ही घोषणा मोदींच्या अंगलट आली आहे. त्यांनी स्वतःचे व्यक्तिस्तोम माजविले आहे", अशी टीकाही चव्हाण यांनी केली.
ADVERTISEMENT