Pune Lok Sabha,Vasant More : मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करून महाविकास आघाडीतून लोकसभा निवडणूक लढवण्यास वसंत मोरे इच्छुक होते. मात्र काँग्रेसकडून बुधवारी अचानक 8 जागांवरील उमेदवाराची नावे समोर आली. यामध्ये पुण्यातून काँग्रेसने रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे आता वसंत मोरेंच्या लोकसभा निवडणूक लढवण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत. त्यात भाजपकडून पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी घोषित झाली आहे. त्यामुळे लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या वसंत मोरेंच नेमकं काय होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (pune lok sabha seat congress ravindra dhangekar vs murlidhar mohol pune vasant more mahayuti vs maha vikas aghadi)
ADVERTISEMENT
मनसेच्या स्थापणेपासून वसंत मोरे मनसेत आहेत. ज्यावेळी राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले होते. त्याचवेळी वसंत मोरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत मनसेसाठी लढायला सुरुवात केली होती. मात्र गेल्या आठवड्यातच वसंत मोरे यांनी अखेरचा जय महाराष्ट्र करत मनसेला सोडचिठ्ठी दिली. या दरम्यान वसंत मोरेंच्या शरद पवारांसोबतच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. त्यामुळे वसंत मोरे तुतारी हाती घेऊन लोकसभा निवडणूक लढतील अशी चर्चा होती. मात्र वसंत मोरे ना शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामील झाले, ना त्यांच्या लोकसभेच्या उमेदवारीबाबत काही निर्णय झाला.
हे ही वाचा : Eknath Shinde : 'जरा जपून बोला', CM शिदेंनी टोचले शिवसेना नेत्यांचे कान
खरं तर वसंत मोरे हे काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. याबाबत त्यांची शरद पवार आणि पुण्यातील काँग्रेस नेत्यांसोबत बैठक देखील पार पडली होती.मात्र या बैठकीत काहीच निर्णय झाला नाही. त्यात बुधवारी काँग्रेसची दिल्लीत कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीतून काँग्रसेच्या 8 जागांवरील उमेदवारांची नावे समोर आली होती. यामध्ये पुणे लोकसभा मतदार संघातून काँग्रेसने रविंद्र धंगेकर यांचे नाव निश्चित केले होते. त्यामुळे वसंत मोरेंच्या लोकसभा निवडणूक लढवण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत.
दरम्यान आता काँग्रेसने पुण्यातला उमेदवार निश्चित केल्याने वसंत मोरे काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासूनची वसंत मोरेंच्या सोशल मीडियावरच्या पोस्ट पाहिल्या असत्या, ते पुण्यातून खासदारकी लढवण्यावर ठाम असल्याचे दिसते. तसेच निवडणूक एकतर्फी कशी होते बघतोच मी, असे देखील सोशल मीडियावर म्हटले आहे. मला एका बाबांनी एक पेपरचे कात्रण दिलं आणि मला बोलले मी तुमची आज वाटच बघत होतो ही घ्या तुमची बातमी म्हणजे वसंत मोरेचा राम राम कुठपर्यंत पोहोचलाय याचा थोडा अभ्यास करा खासदार तर मीच होणार, असे पुन्हा एकदा वसंत मोरे यांनी स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे वसंत मोरे अपक्ष म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT