Sanjay Shirat big Secret revealation : एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मला फोन करून मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा दावा उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केला होता. फडणवीसांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. असे असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी देखील खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. ''उद्धव ठाकरेंनी (Udhhav thackeray) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना देखील फोन केला होता आणि तुम्हाला मुख्यमंत्री करतो, असा खळबळजनक दावा केला आहे. या दोन्ही दाव्यांची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (sanjay shirat big revealation udhhav thackeray call eknath shinde for cm post devendra fadnavis maharashtra politics)
ADVERTISEMENT
संजय शिरसाट हे नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट यांना देवेंद्र फडणवीसांनी केलेला दावा खरा असल्याचे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीसांनी जे सांगितलं ते खरं आहे. आणि ''उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना देखील फोन केला होता आणि तुम्हाला मुख्यमंत्री करतो, अशी ऑफर दिली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे शिरसाटांच्या या दाव्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
हे ही वाचा : सोमय्यांनी काढलेल्या वायकर, जाधवांच्या घोटाळ्यांचं पुढे काय झालं?
''देवेंद्र फडणवीसांनी जे सांगितलं हे खरं आहे.पण त्यांनी सांगितलं आम्ही एकनाथ शिंदे यांना सपोर्ट केलाय. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनाही फोन केले होते.मात्र त्यांनी उचलले नव्हते. त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांना कॉल केला होता. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना देखील फोन केला होता की, तुम्हाला मुख्यमंत्री करतो. पण ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार यांना सोडायला तयार नव्हते. मात्र नंतर अजित पवार गट आमच्यासोबत आला होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट शिरसाट यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीसांचा दावा काय?
झी 24 तासने देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतील देवेंद्र फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ''जेव्हा शिंदे आणि (भाजप) आम्ही सोबत येत होतो. त्या दिवशी सकाळी मला उद्धवजींचा फोन आला होता. ते मला म्हणाले, तु्म्ही मी कशाला त्यांना (बंडखोरांना) सोबत घेताय. त्यांना (एकनाथ शिंदे) कशाला पद देताय. मी संपूर्ण शिवसेना पक्ष घेऊन येतो, अशी ऑफर उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे देवेंद्र फडणवीस सांगितले. तसेच उद्धव ठाकरेंनी यावेळी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफरही दिली होती. मिलिंद नार्वेकरांनी मला फोन लावला. मग उद्धव ठाकरे बोलले. पण मी त्यांना सांगितलं वेळ निघून गेली आहे. या निर्णयाशी वरिष्ठांशी बोला, असा सल्ला मी त्यांना दिला. माझ्या पातळीवर हा निर्णय संपल्याच मी ठाकरेंना सांगितलं. जे सोबत आले त्यांच्याशी मी बेईमानी करणार नाही, असे त्यांनी मी स्पष्ट सांगितलं, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला.
हे ही वाचा : 'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात काय X% मारली?', राणेंचा तोल सुटला!
दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि संजय शिरसाटांच्या या खळबळजनक खुलास्यावर आता ठाकरे गट काय प्रतिक्रिया देतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT