Sharad Pawar : "...आणि शिव्या आम्हाला घालता?", पवारांनी सभेतच लावलं मोदींचं 'ते' भाषण

भागवत हिरेकर

24 Apr 2024 (अपडेटेड: 24 Apr 2024, 02:08 PM)

Sharad Pawar on PM Modi : महागाईच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. त्यांनी जुने भाषण लोकांना ऐकवले.

शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना उत्तर. लोकांना ऐकवलं ते भाषण.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार.

follow google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल

point

लोकांना ऐकवलं मोदींचं जुनं भाषण

point

मोदींच्या आश्वासनांना म्हणाले, "लबाडाच्या घरचे आवतण"

Sharad Pawar On PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून होत असलेल्या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिले. मोदींचे 2014 मधील भाषण लोकांना ऐकवत शरद पवारांनी मोदींना घेरले. पवार मोदींबद्दल काय म्हणाले आणि मोदींच्या त्या भाषणात काय आहे? जाणून घ्या. (Sharad Pawar Played PM Narendra Modi's old speech on Inflation)

हे वाचलं का?

माढाचे उमदेवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवारांनी मोदींना जुन्या भाषणावरून कात्रीत पकडले. 

पवार म्हणाले, "गेली १० वर्ष देशातील सरकार भाजपच्या हातात आहे. आज मोदींच्या हातात देशाचा कारभार आहे. त्यांनी अनेक आश्वासने दिली होती. त्यांनी आश्वासन दिले की, महागाई कमी करणार. पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर १५ दिवसांच्या आत लोकांना मी महागाईतून बाहेर काढणार, हे पहिलं आश्वासन होतं."

महागाईवर पवारांनी मोदींना सुनावलं

"आपण शेती करणारे लोक आहोत. एकेकाळी वाहनं कमी होती. आता वाहनांची संख्या वाढली. त्याची महत्त्वाची गरज काय, तर पेट्रोलची आहे. २०१४ ला मोदी पंतप्रधान झाले, त्यावेळी त्यांनी आश्वासन दिले होते की, ५० दिवसाच्या आत पेट्रोलची किंमत ५० टक्क्यांनी आणणार. काय किंमत होती? २०१४ ला पेट्रोलची किंमत ७१ रुपये लिटर होती. मोदींचा शब्द होता की ५० दिवसात खाली आणतो. लोकांना वाटलं की, ७१ वरून ५०, ६० वर येईल. आज ३ हजार ४५० दिवस मोदींनी आश्वासन देऊन झाले. काय किंमत आहे आज, आजची किंमत १०६ रुपये आहे. म्हणजे ७१ ची किंमत १०६ वर नेली.

 

"घरामध्ये स्वयंपाक गॅस भरतो. गॅसचे सिलिंडर स्वस्तात देऊ असे आश्वासन मोदींनी २०१४ ला दिले. त्यावेळी सिलिंडरची किंमत ४१० रुपये होती. आज ती ११०७ आहे. कसा विश्वास या लोकांवर ठेवायचा?", असा प्रश्न पवारांनी मोदींना केला.

हेही वाचा >> हेमंत गोडसेंची पुन्हा वाढली चिंता; महायुतीत 'नाशिक'वरून नवा ट्विस्ट! 

"महागाई असो अनेक प्रश्न असो... त्यासंदर्भात दिलेली आश्वासने पाळली नाहीत. त्या काळात त्यांनी भाषणे केली त्याची माहिती तुम्हा लोकांना नसेल. मी मुद्दाम मनमोहनसिंग पंतप्रधान असतानाचं त्यांचं भाषण ऐकत होतो", असं म्हणत पवारांनी मोदींचं भाषण मोबाईलवर लावलं. 

मोदींनी 2014 मध्ये काय केलं होतं भाषण?

"आज पंतप्रधान इथे आले होते. पण, पंतप्रधान महागाईचा म बोलायला तयार नाही. महागाईचा म... यांचा अंहकार इतका आहे की, महागाईबद्दल एक शब्द बोलायला तयार नाहीत. मरो तो मरो... तुमचं नशीब. गरीबाच्या घरात चूल पेटत नाही, तर मुलं रात्रभर रडतात आणि आई अश्रू पिऊन झोपते. आणि देशाच्या नेत्यांना गरिबाची काळजीच नाही. हे गरिबांचे हाल केले आहेत. ४ तारखेला मतदान करायला जाताना घरातील गॅस सिंलिडरला नमस्कार करून जा."

लबाडाच्या घरचं आवतण...; पवारांचे मोदींना टोले

हे भाषण ऐकवल्यावर पवार मोदींना उद्देशून म्हणाले, "तर हे त्यांचं २०१४ चे भाषण आणि आज दिलेल्या शब्द पाळला नाही. सामान्य माणसाची महागाईतून सुटका केली नाही. आणि शिव्या आम्हाला लोकांना घालताहेत. दहा वर्षात तुम्ही काय केलं? अरे राज्य तुझ्याकडे, आम्ही विरोधी पक्षात आणि जबाब आम्हाला मागता? याचा अर्थ एकच आहे की, मोदी दिलेला शब्द पाळत नाही."

हेही वाचा >> "मोदींना मंगळसूत्राचं महत्त्व समजलं असतं, तर...", प्रियांका गांधींचा वार

"आपल्याकडे एक म्हण आहे... ती म्हण अशी आहे की, लबाडाच्या घरचं आवतण जेवल्याशिवाय खरं नाही. ही म्हण माहितीये का तुम्हाला? आणि आज हीच स्थिती मोदींनी देशात केली आहे. मोदींच्या राजवटीत सामान्य माणसाचा जो अधिकार आहे, त्यावर संकट येण्याची शक्यता आहे", अशी भीतीही पवारांनी व्यक्त केली.

    follow whatsapp