Sharad Pawar : "भाजप अशीच भूमिका राष्ट्रवादी-शिवसेनेबद्दल घेईल"

मुंबई तक

20 May 2024 (अपडेटेड: 20 May 2024, 03:17 PM)

Sharad Pawar on JP Nadda's Statement : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी केलेल्या विधानावर बोट ठेवत शरद पवार यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना इशारा दिला आहे.

जे.पी. नड्डांचं विधान... शरद पवारांनी एकनाथ शिंदे, अजित पवारांना काय दिला इशारा?

शरद पवार, एकनाथ शिंदे आणि अजित पवार.

follow google news

बातम्या हायलाइट

point

जे.पी. नड्डा यांच्या विधानावर शरद पवार काय बोलले?

point

अजित पवार, एकनाथ शिंदेंना पवारांचा इशारा

point

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलच्या विधानावरून उलट सुलट चर्चा

Sharad Pawar on BJP RSS : भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केलेल्या विधानावर बोट ठेवत शरद पवार यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना इशारा दिला आहे. भाजपची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल जी भूमिका आहे,तीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेबद्दल आहे, असे पवार एका मुलाखतीत म्हणाले आहेत. मूळ मुद्दा काय आणि पवार काय म्हणालेत, हेच जाणून घ्या. ('BJP will end NCP and Shiv Sena', Sharad Pawar warning to Eknath Shinde, Ajit Pawar)

हे वाचलं का?

'सुरूवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीची आम्हाला निश्चितच गरज होती, पण आता भाजप सक्षम झाला आहे. भाजप मजबूत पक्ष झाला आहे', असे विधान जे.पी. नड्डा यांनी एका मुलाखतीत केले.

शरद पवार नड्डांच्या विधानाबद्दल काय बोलले?

"भाजपसह जायचं हे आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं म्हणणं होतं. आपण सत्तेत गेलं पाहिजे ही बाब त्यांनी माझ्यापासून लपवून ठेवली नव्हती. मी एक दिवस त्यांचा प्रस्ताव काय आहे, तो मागून घेतला. तो प्रस्ताव समजून घेताना आमची चर्चा झाली. प्रत्येकाने भूमिका मांडली पण मी भाजपसोबत जाण्याची भूमिका स्वीकारली नाही. मी शेवटी त्यांना सांगितलं की, तुम्ही भाजपसोबत जाणार असाल, तर जा; मी येणार नाही."

मोदी प्रचंड घाबरलेत -शरद पवार

पवार म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड घाबरले आहेत. त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात सभा घेतल्या आहेत. लोकांशी संवाद साधत असताना त्यांनी व्यक्तिगत हल्ले करताहेत. देशासमोरचे प्रश्न बाजूला ठेवून मला भटकती आत्मा म्हणणे आणि राहुल गांधींचा उल्लेख शहजादा करणे चुकीचे आहे", अशी टीका पवारांनी मोदींवर केली.

हेही वाचा >> "शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री केलं, तरी आम्ही...", फडणवीसांचं विधान 

नड्डा यांनी केलेल्या विधानाबद्दल बोलताना पवार म्हणाले की, "भाजपमध्ये एक काळ असा होता की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांची (RSS) त्यांना गरज होती. पण, आता भाजपने त्यांचा विस्तार मोठ्या प्रमाणावर केला आहे. भाजप स्वतःचा कारभार स्वतः करण्यासाठी सक्षम आहे, हे मी म्हणत नाही तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीच म्हटले आहे."

हेही वाचा >> फडणवीसांचा उपमुख्यमंत्री होण्यास नकार, मग मोदींनी केला फोन!

"संघ विचारांनी बळकट असलेल्या भाजपने जर संघाबाबत असे म्हटले आहे, तर मग भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या दोन पक्षासाठी ही धोक्याची घंटा आहे. ज्या दिवशी भाजपची गरज संपेल, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेबद्दलही अशीच भूमिका भाजप घेऊ शकते", असा इशारा पवारांनी शिंदे आणि अजित पवारांना दिला.

    follow whatsapp