Eknath Shinde : मोदींच्या सरकारमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे 'हे' खासदार होणार मंत्री?

ऋत्विक भालेकर

06 Jun 2024 (अपडेटेड: 06 Jun 2024, 06:06 PM)

NDA Government Cabinet allocation 2024 : भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नसले, तरी एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दोन मंत्रिपदे मागितली आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील दोन खासदारांची नावे चर्चेत.

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिवसेनेकडून दोन मंत्रिपदाची मागणी

point

एकनाथ शिंदे दोन ज्येष्ठ खासदारांना देणार संधी

Eknath Shinde Shiv Sena : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले. भाजपला २४० जागा मिळाल्या, तर एनडीएला 293 जागा मिळाल्या आहेत. मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. त्यात एनडीएतील मित्रपक्षांनी जास्त मंत्रि‍पदे मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही मंत्रि‍पदांची मागणी केली आहे. (Eknath Shinde’s Shiv Sena is demanding one cabinet berth and MoS in the union cabinet)

हे वाचलं का?

एनडीएतील घटकपक्ष असलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशम पार्टीनेही जास्त आणि महत्त्वाची खाती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे नितीश कुमार यांच्या जदयूही जास्त मंत्रि‍पदे पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहे. 

शिंदेंच्या शिवसेनेला हवीत दोन मंत्रि‍पदे

एनडीएतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे लोकसभा निवडणूक ७ खासदार निवडून आले आहेत. शिवसेनेने एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्य मंत्रि‍पदाची मागणी केली आहे.

हेही वाचा >> अजित पवारांचा मतदारसंघच धोक्यात! बारामतीकरांचा 'मेसेज' काय? 

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने लोकसभेच्या 15 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 7 जागा जिंकल्या आहेत. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने आता मित्रपक्षांची मर्जी राखवी लागणार आहे. त्यामुळे मंत्रि‍पदांचे वाटप करताना भाजपला बरीच कसरत करावी लागणार असून, शिंदेंना दोन मंत्रि‍पदे मिळतात की, राज्यातील सत्तेत त्यांची भरपाई करण्याचे आश्वासन मिळते, हे बघावे लागेल. 

श्रीकांत शिंदे केंद्रात मंत्री होणार?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केंद्रात दोन मंत्रि‍पदे मागितली आहे. दोन मंत्रि‍पदे मिळाली, तर शिवसेनेतून कुणाला संधी मिळणार, याबद्दलही चर्चा सुरू झाली आहे. यात मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांच्या नावाचीही चर्चा आहे. 

याला शिवसेनेतील सूत्रांनी मात्र नकार दिला आहे. नव्या सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपदासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याऐवजी इतर खासदारांना संधी दिली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा >> मोदींची सभा, फडणवीसांची ताकद... माढ्यात कोणत्या फॅक्टरमुळे झाला भाजपचा पराभव? 

श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. शिवसेनेतील एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याऐवजी पक्षातील इतर ज्येष्ठ खासदारांना मंत्रिपदाची संधी दिली जाईल, असे सूत्रांनी म्हटले आहे.

शिवसेनेतून कुणाला मिळणार संधी?

मोदींच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे शिवसेनेच्या कोणत्या खासदाराला संधी देणार, याची उत्सुकता आहे. श्रीकांत शिंदे यांना संधी देणार नसल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ खासदाराला संधी देणार असेही सांगितले आहे.

हेही वाचा >> मोदींचं नाणं महाराष्ट्रात वाजलंच नाही, 19 सभा घेतल्या पण किती उमेदवार जिंकले? 

ज्येष्ठ खासदारांमध्ये बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, मावळचे श्रीरंग बारणे हे दोघेच आहेत. तर राज्यात मंत्री असलेल्या संदीपान भुमरे यांच्या नावाचीही चर्चा आहे. ज्येष्ठत्वाचा निकष लावला गेल्यास प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे या दोघांना संधी मिळणार हे स्पष्ट आहे.

    follow whatsapp