Sonia Doohan : "शरद पवारांसाठी मरायला तयार, पण सुप्रिया सुळेंमुळे...", दुहानांची खदखद

प्रशांत गोमाणे

28 May 2024 (अपडेटेड: 28 May 2024, 03:44 PM)

Sonia Duhan : अजित पवारांच्या घरी आमदार आल्यावर सुप्रिया सुळेही तिथे होत्या. पक्ष फुटण्याच्या काही तास आधी सुप्रिया सुळेही अजित पवारांच्या निवसासस्थानी होत्या. तेव्हा त्या कुठे अजित पवारांच्या पक्षात गेल्या? त्यामुळे मी कुठल्याही पक्षात प्रवेश केला नाही, मी शरद पवारांचा पक्ष सोडणार नाही', अशी भूमिका सोनिया दुहान यांनी स्पष्टपणे मांडली.

sonia duhan big allegation on supriya sule ajit pawar ncp join sharad pawar ncp ncp politics

सोनिया दुहान यांनी सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप केले आहेत.

follow google news

Sonia Duhan Big Allegation on Supriya Sule : शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू सोनिया दुहान अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. या चर्चावर आता सोनिया दुहान (Sonia Duhan)  यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. 'मी शरद पवारांचा गट सोडला नाही. ते आमचे दैवत आहेत आणि दैवत राहतील' अशी भूमिका सोनिया दुहान यांनी मांडली आहे. यासह सोनिया दुहान यांनी सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) गंभीर आरोप देखील केले आहेत. (sonia duhan big allegation on supriya sule ajit pawar ncp join sharad pawar ncp ncp politics) 

हे वाचलं का?

सोनिया दुहान पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या चर्चांवर दुहान म्हणाल्या, 'मी शरद पवारांचा गट सोडलेला नाही, तसेच दुसऱ्या पक्षात म्हणजेच अजित पवारांच्या गटात जाणार नाही. मला काल लोकांनी बैठकीत पाहिलं त्यांच्यानंतर चर्चा सुरू झाल्या होत्या. पण ज्यावेळेस पक्ष फुटत होता, तेव्हा अजित पवारांच्या घरी आमदार आल्यावर सुप्रिया सुळेही तिथे होत्या. पक्ष फुटण्याच्या काही तास आधी सुप्रिया सुळेही अजित पवारांच्या निवसासस्थानी होत्या. तेव्हा त्या कुठे अजित पवारांच्या पक्षात गेल्या? त्यामुळे मी कुठल्याही पक्षात प्रवेश केला नाही, मी शरद पवारांचा पक्ष सोडणार नाही', अशी भूमिका सोनिया दुहान यांनी स्पष्टपणे मांडली.

हे ही वाचा : पुणे अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट, ससून रुग्णालयातला एक कर्मचारी गायब

सुप्रिया सुळेंवर आरोप काय? 

सोनिया दुहान यांनी पक्ष सोडणार नसल्याची भूमिका मांडल्यानंतर सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप देखील केले आहेत. 'मी आणि धीरज शर्मा किंवा आणखीण काही लोक अनेक वर्षापासून पवार साहेबांशी एकनिष्ट राहून काम करतो आहे. सुप्रिया सुळे शरद पवारांच्या कन्या आहेत, म्हणून त्यांचा आदर आहे. पण सुप्रिया सुळे आमच्या लीडर बनू शकल्या नाही. सुप्रिया सुळे आणि त्यांच्या जवळची नेतेमंडळी सध्या पक्षाचं काम करणाऱ्या लीडर लोकांना संपवण्याचं काम करत आहेत. त्यांना पदावरून हटवण्याचं काम सूरू आहे. त्यांना पक्ष सोडण्यास भाग पाडले जात आहे, असा गंभीर आरोप सोनिया दुहान यांनी सुप्रिया सुळेंवर केला.

हे ही वाचा : "महायुतीला 20 जागांचा फटका, मविआला...", यादवांनी वाढवलं भाजपचं टेन्शन

''या कारणामुळे आमच्यासारखे एकनिष्ठ लोक शरद पवारांची राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेत आहेत.  मी अजून पक्ष सोडला नाही. पण लवकरच पक्ष सोडण्याचा निर्णय घेईन. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही आहे.मी सध्या असा कोणताही निर्णय घेत नाही आहे'', असे सोनिया दुहान यांनी सांगितले. 
 

    follow whatsapp