मुंबई Tak चावडी : सुप्रिया सुळेंचा PM मोदींवर हल्ला, 'भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन देशासोबत गद्दारी...'

मुंबई तक

18 May 2024 (अपडेटेड: 18 May 2024, 03:48 PM)

Supriya Sule Reply Narendra Modi : सुप्रिया पवारांमुळे राष्ट्रवादीचा पक्ष फुटल्याचा आरोप पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी केला होता. या आरोपावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोकसभेच्या प्रचारात मला एक गोष्ट खूप चांगली वाटली. ती म्हणजे भाजपने आम्हाला भ्रष्टाचारातून मुक्त केलं.त्यामुळे मी भाजपचे मनापासून आभार मानते.

supriya sule reply narendra modi and amit shah on ncp split statement mumbai tak chavadi lok sabha election 2024

माझ्यामुळे ना देशाला नुकसान झालंय, ना पक्षाला झालंय

follow google news

Supriya Sule, Mumbai Tak Chavadi : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह यांनी पुत्र प्रेम (आदित्य ठाकरे) आणि पुत्री प्रेम (सुप्रिया सुळे) यांच्यामुळे ठाकरे, पवारांचा पक्ष फुटल्याचा आरोप केला होता. या आरोपावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुंबई तक चावडीवर (Mumbai Tak Chavadi) जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इतकंच नाही तर सुप्रिया सुळे यांनी भाजपचे आभार देखील मानले आहेत. (supriya sule reply narendra modi and amit shah on ncp split statement mumbai tak chavadi lok sabha election 2024)  

हे वाचलं का?

मुंबई तक चावडीवर आज सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. यावेळी लोकसभेच्या अनुषंगाने अनेक मुद्यावर त्यांनी दिलखुलास उत्तरं दिली होती. सुप्रिया सुळे यांच्यामुळे पवारांचा पक्ष फुटल्याचा आरोप पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी केला होता. या आरोपावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोकसभेच्या प्रचारात मला एक गोष्ट खूप चांगली वाटली. ती म्हणजे भाजपने आम्हाला भ्रष्टाचारातून मुक्त केलं.त्यामुळे मी भाजपचे मनापासून आभार मानते. तसेच  मुलीवर प्रेम असणं आणि भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन देशासोबत गद्दारी करण्यापेक्षा मुलीचे प्रेम नक्कीच निखळ आहे. त्यामुळे माझ्यामुळे ना देशाला नुकसान झालंय, ना पक्षाला झालंय, असा पलटवार सुप्रिया सुळेंनी मोदींवर केला. 

हे ही वाचा : 'शरद पवारांनी मोठ्या चुका केल्या'; पृथ्वीराज चव्हाण असं का म्हणाले?

सुप्रिया सुळेंचे फडणवीसांना आव्हान 

सुप्रिया सुळेंना यावेळी अजित पवारांवर झालेल्या सिंचन घोटाळ्यावरही प्रश्न विचारला होता. यावर सु्प्रिया सुळे म्हणाल्या की, ''देवेंद्र फडणवीसांची एक मुलाखत वाचली, इंग्रजी आणि मराठी अशी दोन्ही भाषेत वाचली. या मुलाखतीत फडणवीस म्हणाले, सिंचन घोटाळ्यात मी जे आरोप केले होते त्याचे एफआयआर झाले. याचा अर्थ काहीतरी झालं होतं. पण ते अधिकारी पातळीवर झाले आणि पुढे काहीच झाले नाही. अशा परिस्थितीत माझे दोन प्रश्न देवेंद्र फडणवीसांना आहेत. जर घोटाळा झाला असेल तर ना खाऊंगा ना खाने दुंगा त्याचं काय झालं? आणि जर नसेल झाला असेल तर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची माफी मागितली पाहिजे. हो मी चुकलो'', असे आव्हानच सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिले. 

हे ही वाचा : PM Modi Mumbai: ठाकरे-पवार रडारवर.. PM मोदी मुंबईकरांना काय म्हणाले?

पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांच्या गटाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेंच्या शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. या मोदींच्या या ऑफरवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला चिंता वाटायला लागली आहे.जर आदित्य आणि माझ्यासाठीच ठाकरे, पवार लढतायत. मग आता आमचं ओझ पण भाजप घेणार का?  ते (नरेंद्र मोदी) काय बोलले या दोघांची स्वप्न पुर्ण करण्यासाठी भाजपसोबत जा. म्हणजे आमचीपण स्वप्ने पुर्ण करण्यासाठी भाजपने गधामजूरी करायची. मग भाजपने काय काय करायचं. एक तर ते जास्त जागा लढणार आणि तरीही मुख्यमंत्र्यांचा आग्रह करणार नाही.आम्हाला आघाडीत घेणार आणि माझ्या आणि आदित्यची सगळी करीअरची जबाबदारी त्यांनीच करायची. बिचाऱ्या भाजपने काय काय करायचं. आमच्या सारख्या लोकांसाठी आयुष्यभऱ सतरंज्याच उचलायच्या. आमच्यासारख्या लोकांसाठी गधामजुरी करायच्या.मला भाजपसाठी खूप वाईट वाटते, अशी खोचक टीका सुप्रिया सुळेंनी केली. 

अजित पवार यांनी मध्यंतरी जर मी मुलगा असतो तर मला वेगळी वागणूक मिळाली असती, असे विधान केले होते. अजित पवारांच्या या विधानावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ''मग डेटा काढूया. माझं करीअर आणि त्यांच करीअर, त्यांना पक्षातून काय मिळालं आणि मला काय मिळालं. पण मी काय पक्षाकडून मागितलचं नाही. मला खासदारकी शिवाय कशातच इंटरेंस्ट नव्हता. ना मला बँकेचा चेअरमन व्हायची हौस आहे. ना सोसायटी ना कारखानाचे चेअरमन. हे माझं राजकारणच नाही आहे'', असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. तसेच लोकसभेत महाविकास आघाडीच्या 48 पैकी  24-26-28 अशा जागा येतील, असा विश्वास व्यक्त केला. 

 

    follow whatsapp