Pune Accident : 'देवेंद्रजी, महाराष्ट्राला 'या' प्रश्नाचं उत्तर द्या', सुप्रिया सुळेंनी पकडलं खिंडीत

प्रशांत गोमाणे

23 May 2024 (अपडेटेड: 23 May 2024, 05:00 PM)

Pune Porsche Accident : पुण्यातील अपघातावर अजित पवार यांनी कुठलीय प्रतिक्रिया दिला नसल्याचा सवाल पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारला होता. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी पालकमंत्र्यांची काही भेट झाली नाही. पण हा प्रश्न तुम्ही देवेंद्र फडणवीस पुण्यात आल्यावर त्यांना विचारायला हवा होता.

supriya sule slam devendra fadnavis pune porsche accident news criticized nitesh rane pune accident news

इंदापूर आणि निरा या दोन्ही ठिकाणी मी पु्ण्याच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

follow google news

Supriya Sule on Devendra Fadnavis, Pune Accident  : पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कारच्या अपघाताने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेवरून आता पुण्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. त्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलिसांवर राजकीय दबाव टाकल्याचा आरोप केला होता. यावर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी फडणवीसांना उत्तर दिले आहे. सुप्रिया सुळे नेमक्या काय म्हणाल्या आहेत. हे जाणून घेऊयात. (supriya sule slam devendra fadnavis pune porsche accident news criticized nitesh rane pune accident news) 

हे वाचलं का?

सुप्रिया सुळे पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी कुठल्याही राजकीय दबावाखाली येऊ नये. पण दबावतंत्र सत्तेत असलेली लोकचं देऊ शकतात. त्यामुळे देवेंद्रजी कुणाबद्दल बोलत होते, याचे उत्तर त्यांनी महाराष्ट्राला द्यायला हवं, राजकीय दबाव कोण टाकतोय? कोणी फोन केला होता? कुणामुळे जामीन मिळाला? या सगळ्या गोष्टींचे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला द्यावे, अशी माझी विनंती असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. 

हे ही वाचा : Dombivali Blast : डोंबिवली हादरली! बॉयलरच्या स्फोटात चौघांचा मृत्यू

पुण्यातील अपघातावर अजित पवार यांनी कुठलीय प्रतिक्रिया दिला नसल्याचा सवाल पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारला होता. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी पालकमंत्र्यांची काही भेट झाली नाही. पण हा प्रश्न तुम्ही देवेंद्र फडणवीस पुण्यात आल्यावर त्यांना विचारायला हवा होता, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

पुण्याच्या अपघाताच्या घटनेवर सुप्रिया शांत का आहेत? शरद पवार गटाकडून या घटनेवर प्रतिक्रिया का येत नाही आहे? अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबियांचाा संबंध आहे का? असे सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केले होते. यावर आता सुप्रिया सुळेंनी उत्तर दिले आहे.   

हे ही वाचा : Sangli Lok Sabha : ठाकरेंचा सांगलीत 'गेम'; काँग्रेसचा मेसेज, विशाल पाटलांना ताकद?

 इंदापूर आणि निरा या दोन्ही ठिकाणी मी पु्ण्याच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. कदाचित भाजपच्या इतक्या मोठ्या टीमकडून ते राहुल गेलं असावं, असा टोमणा सुप्रिया सुळेंनी नितेश राणेंना मारला. तसेच ज्यांच्या राजकीय दबावामुळे एकाला जामीन मिळाला आहे, ते मला विचारतात, जी विरोधी पक्षात बसली आहे. हा अगदीच बालिशपणा आहे, असा टोला देखील सुप्रिया सुळेंनी नितेश राणेंवर लगावला.

    follow whatsapp