Mirzapur 3 : 'त्या' हॉट सीनवर काय बरंच काही बोलली सलोनी भाभी!

रोहिणी ठोंबरे

30 Jul 2024 (अपडेटेड: 30 Jul 2024, 05:28 PM)

Mirzapur Season 3 : अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मिर्झापूर सीझन 3 ला लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. पण ज्या पात्राची सर्वाधिक चर्चा झाली ते पात्र म्हणजे सलोनी भाभी...

Mumbaitak
follow google news

Mirzapur Season 3 : अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मिर्झापूर सीझन 3 ला लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. पण ज्या पात्राची सर्वाधिक चर्चा झाली ते पात्र म्हणजे सलोनी भाभी... ही भूमिका अभिनेत्री नेहा सरगमने साकारली आहे. तिने या सीरिजमध्ये दत्ता त्यागीच्या मोठ्या सूनेची भूमिका साकारली आहे. यामध्ये नेहा आणि विजय वर्मा यांच्यात एक इंटीमेट सीनही आहे. हा सीन या सीझनमधील सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरतोय. लोकांकडून या सीनला प्रचंड पसंती मिळत आहे. अभिनेत्री नेहा सरगम हिने आता यावर स्वत:हून भाष्य केले आहे. (actress neha sargam speaks on her intimate scene in mirzapur season 3)

हे वाचलं का?

एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नेहाने सांगितले की, सलोनी भाभीच्या भूमिकेसाठी तिला लोकांकडून खूप प्रेम मिळत आहे. अनेकजण तिच्या प्रेमात पडले आहेत. पण इंटिमेट सीन देण्यापूर्वी ती खूप घाबरली होती.  

हेही वाचा : Uddhav Thackeray : मराठ्यांना 'ओबीसी'तून आरक्षण द्यावं का? ठाकरे म्हणाले, "मोदींनी निर्णय..."

नेहा म्हणते, 'मिर्झापूरचा फॅंडम खूप वेगळा आहे. या सीरिझची क्रेझ काही वेगळीच आहे. लोक मीम्स तयार करत आहेत की, सलोनी भाभीसारखी बायको मिळवण्यासाठी सोमवारचे किती उपवास करावे लागतील? '

पुढे नेहा म्हणाली, 'हा इंटीमेट सीन दिल्यानंतर लोक मला स्वीकारतील याची अपेक्षा नव्हती. लोक काय विचार करतील याबद्दल मी खूपच घाबरले होते. एवढं की, मी दिग्दर्शकालाही सांगितलं होतं की मी हे करू शकणार नाही. हा सीन इंटीमेट असला तरी मिर्झापूरच्या इतिहासातला एक सॉफ्ट इंटीमेट सीन आहे. मला वाटलं होतं की, यानंतर खूप नकारात्मक प्रतिक्रिया येतील, लोक मला खूप ट्रोल करतील. पण, सर्व याउलट झाले.'

हेही वाचा : Yashashree Shinde : दाऊद शेखने यशश्रीची का केली हत्या? पोलिसांकडून मोठा खुलासा

'मला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोक लिहित आहेत की आम्ही तर हिला पूर्वीपासून ओळखतोय, ही यशोमती आहे.... हिने तर सीतेची भूमिका केली होती. मला आश्चर्य आणि आनंद दोन्ही वाटतोय कारण या पात्रांमुळे मला ट्रोल केले जात नाही आहे.' असंही नेहा म्हणाली. 

हेही वाचा : Paris Olympic 2024 : मनू भाकर-सरबजोत जोडीचा 'कांस्य' वेध! भारताच्या खात्यात दुसरं पदक

या सीरिजनंतर नेहाचा इंडिय आयडॉलमधील एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती ऑडिशन देताना दिसत आहे. नेहाने याबद्दल सांगितले की, तिची क्लिप त्यावेळी खूप व्हायरल झाली होती. त्यानंतर तिला अभिनयाच्या ऑफर्स येऊ लागल्या. नेहाने आतापर्यंत रामायण, चांद छुपा बादल में, यशोमती मैय्या के नंदलाला अशा प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये काम केले आहे. 

 
 

    follow whatsapp