Big Boss Marathi 5: 'जरा हटके अन् गुलीगत फटके', निक्की-अरबाजला कॅप्टन सूरज दाखवणार मराठी पॅटर्न!

रोहिणी ठोंबरे

• 12:31 PM • 10 Sep 2024

Big Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठी सीझन 5 मधील स्पर्धक सूरज चव्हाण सध्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असतो. यावेळी तो आठवड्यासाठी कॅप्टन्सी सांभाळत आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

बिग बॉस मराठीच्या घरात सूरजने मोठ्या प्रमाणात कल्ला करतोय

point

घरात आता संग्राम चौगुलेची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली

point

आजच्या प्रोमोमध्ये सूरज दाखवणार मराठी पॅटर्न

Big Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठी सीझन 5 मधील स्पर्धक सूरज चव्हाण सध्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असतो. यावेळी तो आठवड्यासाठी कॅप्टन्सी सांभाळत आहे. यादरम्यान सर्वांना सूरजचं नवं रूप पाहायला मिळत आहे. आजच्या एपिसोडमध्ये कॅप्टन सूरज निक्की-अरबाजला त्याचा मराठी पॅटर्न दाखवताना दिसणार आहे. चाहते हे पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. (Big Boss Marathi Season 5 captain Suraj chavan guligat dhoka will show new stratergy to arbaaz and nikki tamboli in bb house )

हे वाचलं का?

बिग बॉस मराठीच्या घरात सूरजने मोठ्या प्रमाणात कल्ला करत आहे. त्याच्या अनोख्या स्टाइवर चाहते फिदा आहेत. तसंच सूरजची फॅन फॉलोइंग प्रचंड तगडी आहे. यासोबतच त्याचे गुलीगत धोका आणि बुक्कीत टेंगुळ या डायलोग्जची बातच न्यारी आहे. 

हेही वाचा : Maharashtra Weather: गौराईच्या आगमनाला पावसाची हजेरी? पाहा आजचा IMD चा अंदाज

 

घरात आता संग्राम चौगुलेची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. कालच्या (सोमवार 9 सप्टेंबर) एपिसोडमध्ये संग्रामने प्रत्येकाला त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगितलं. त्यानंतर दोन जणांच्या जोडीमध्ये कोण स्ट्रोन्ग कोण विक आहे याबद्दल स्पष्टीकरण दिलं... बिग बॉसच्या आदेशानुसार यावेळी निक्की, अरबाज, डिपी, अंकिता, जान्हवी, आर्या यांना आपल्यात सुधारणा करण्याची गरज आहे असं सांगत संग्रामने त्यांना स्विमिंग पूलमध्ये ढकललं. यानंतर ज्यांना संग्रामने पाण्यात ढकललं आहे त्यांना आठवडाभर कोणतंही फर्निचर वस्तू न वापरण्याचे त्याचबरोबर फक्त उकडलेलं अन्न खाण्याचे आदेश बिग बॉसने दिले. 

हेही वाचा : Gold Price: आज गौरी आगमन! करताय सोनं खरेदी? सणासुदीला घसरल्या किंमती; 1 तोळ्याचा भाव काय?

आता आजच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे की, अंकिता चुकून बेडवर बसते. इतक्यात तिला सर्वजण बिग बॉसच्या आदेशाची आठवण करून देतात आणि ती खाली बसते. पण अरबाज हे पाहतो आणि कॅप्टन सूरजला सुनावतो. मात्र, सूरज काही ऐकून घेताना दिसत नाहीये. 'जरा हटके अन् गुलीगत फटके', म्हणत आज सूजर त्यांचा मराठी पॅटर्न दाखवताना दिसणार आहे. अशावेळी चाहते आजचा एपिसोड पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.    
 

    follow whatsapp