Abhishek vs Aishwarya: अभिषेक बच्चन-ऐश्वर्या रायचा घटस्फोट होणार? खळबळजनक Video आला समोर 

Aishwarya Rai And Abhishek Bachchan Divorce Rumors : बॉलिवूडचे लोकप्रीय कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या-अभिषेक एकत्रित स्पॉट झाले नाहीत.

Abhishek Bachchan And Aishwarya Rai Divorce Update

Abhishek Bachchan And Aishwarya Rai Latest News

मुंबई तक

• 12:24 PM • 18 Sep 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाच्या चर्चांबाबत मोठी अपडेट आली समोर

point

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायचा घटस्फोट होणार का?

point

'त्या' व्हिडीओमुळं तर्क वितर्कांना उधाण

Aishwarya Rai And Abhishek Bachchan Divorce Rumors : बॉलिवूडचे लोकप्रीय कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या-अभिषेक एकत्रित स्पॉट झाले नाहीत. त्यामुळे दोघांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. अशातच एका व्हायरल व्हिडीओनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (There is a lot of discussion on social media about the divorce of Bollywood's popular couple Abhishek Bachchan and Aishwarya Rai. Aishwarya and Abhishek have not been spotted together since last few days)

हे वाचलं का?

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाबाबत सोशल मीडियावर अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. परंतु, याबाबत बच्चन कुटुंबाकडून अद्यापही कोणत्याही प्रकारचं अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. अभिषेक बच्चनने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, आम्ही अजूनही विवाहीत आहोत. पण त्यांच्या कुटुंबात ज्या प्रकारचं वातावरण आहे, ते पाहून नेटकऱ्यांनाही अनेक प्रश्न पडले आहेत. अशातच अभिषेकचा एक डिप फेक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. 

काही महिन्यांपूर्वी अभिषेकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आम्ही दोघंही घटस्फोट घेत आहोत, असं अभिषेकने या व्हिडीओच्या माध्यमातून जाहीर केलं होतं. माझी मुलगी आराध्यासाठी गेले काही वर्ष खूप विचित्र स्वरुपाचे राहिले आहेत. पण ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेण्यामागंच कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे. या व्हिडीओमुळं चाहत्यांना धक्काच बसला. परंतु, अभिषेकने या व्हिडीओची सत्यता सर्वांना सांगितली. हा व्हिडीओ डिप फेक असल्याचं अभिषेकनं स्पष्ट केलं. आर्टिफिशियल इंटिलीजन्सच्या (Artificial Intelligence) माध्यमातून अभिषेकचा हा व्हिडीओ बनवण्यात आला होता.

हे ही वाचा >>  Pune News: पुण्यात कामाच्या ताणामुळे CA तरुणीचा मृत्यू! संतापलेल्या आईचं पत्र व्हायरल 

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलंय की, या व्हिडीओची सत्यता मला माहित नाही की हा व्हिडीओ खरा आहे की खोटा, दिवसेंदिवस अफवा पसरवल्या जात आहेत आणि याबद्दल कोणीही काही बोललं नाही. अनेक इव्हेंट्समध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्रित दिसले नाहीत. ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासोबत एका (SIIMA) पुरस्कार सोहळ्यासाठी दुबईला गेली होती. यावेळी तिला मनी रत्नम यांच्या पोन्नियन सेल्वन 2 चित्रपटासाठी उत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.

आराध्या आणि ऐश्वर्याने या पुरस्कार सोहळ्यात सुंदर आऊटफिट परिधान केला होता. पुरस्कार मिळाल्यानंतर ऐश्वर्या माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाली, माझे गुरु मनी रत्नन यांनी दिग्दर्शीत केलेला पेन्नियन सेल्वन चित्रपट माझ्या हृदयाशी कनेक्ट आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी सर्वकाही आहे. पेन्नियन सेल्वनमध्ये नंदिनीच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, हा आनंदाचा क्षण आम्ही सर्व टीमने साजरा केला. 

    follow whatsapp