अभिनेत्री कंगना रणौतचा पर्सनल बॉडीगार्ड कुमार हेगडेवर एका मेकअप आर्टिस्टनं लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप केले होते. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कुमारनं लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार आणि अनैसर्गिकरित्या शोषण केलं असा धक्कादायक आरोप या महिलेनं केला होता. शिवाय त्यानं तिच्याकडून 50 हजार रुपये घेतले ते अद्याप परत केलेले नाहीत असाही दावा तिनं केला. या प्रकरणी तिनं अधिकृत तक्रार देखील दाखल केली होती. परिणामी मुंबई पोलिसांनी कुमारला ताब्यात घेतलं आहे.कंगनाचा बॉडीगार्ड कुमार हेगडेवर मुंबई पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोप करणारी महिला मुंबईत मेकअप आर्टिस्टचं काम करते. तक्रारकर्त्या महिलेची वैद्यकीय चाचणी आणि तक्रार प्राप्त झाल्यानंतर डीएन नगर पोलिसांनी 19 मे रोजी रात्री गुन्हा नोंदवला.
ADVERTISEMENT
मुंबईच्या डी एन नगर पोलीस स्टेशनमध्ये कंगना रणौतच्या बॉडिगार्ड विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवून एका ब्युटीशयन महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. ब्युटीशियनने दिलेल्या जबाबानुसार आरोपीसोबत 8 वर्षांपूर्वी ओळख झाली होती मात्र आरोपीनं जून महिन्यात लग्नाचा प्रस्ताव ठेवला.आरोपीकडून आलेल्या लग्नाच्या प्रस्तावाचा स्वीकार महिलेकडून करण्यात आला. यानंतर ही महिला आरोपीसोबत त्याच्या फ्लँटवर राहू लागली. दोघांमधले संबंध वाढत गेले.
मात्र नंतर आरोपी लग्नाच्याबाबीकडं दुर्लक्ष करू लागला. 27 एप्रिल रोजी आरोपीनं महिलेकडून 50 हजार रुपये घेतले. यासाठी त्यानं कौटुंबिक कारण देखील दिलं.आरोपी पैसे घेवून कर्नाटककडे रवानाआरोपी पैसे घेवून कर्नाटककडे रवाना झाला. मात्र नंतर महिलेचा फोन उचलनं त्यानं बंद केलं. महिलेनं एकदा आरोपीला फोन लावला असता आरोपीच्या आईनं फोन उचलला. आणि ब्युटिशिएनसोबतच्या लग्नाला नकार देत असल्याचं सांगितलं. तसंच मुलासाठी स्थळ शोधत असल्याचं देखील सांगण्यात आलं. त्यानंतर पीडित महिलेनं पोलीस स्टेशन गाठलं आणि आरोपीच्या विरोधात तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी कलम 376,377 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT