PM Narendra Modi Watches The Sabarmati Report : 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चा रंगलीय. बहुचर्चीत असलेल्या या चित्रपटाची संसदेत बाल योगी ऑडिटोरियममध्ये स्पेशल स्क्रीनिंग केली जाणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी संसदेत द साबरमती रिपोर्ट या चित्रपटाची स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आलीय. काही दिवसांपूर्वी मोदींनी या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. घटनेच्या मागील सत्य काय असतं, हे या चित्रपटाच्या माध्यमातून समजतं, असं मोदींनी म्हटलं होतं.
ADVERTISEMENT
'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट गुजरात हिंसाचारावर आधारित आहे. मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. तसच अनेक भाजपशासित राज्यांनी द साबरमती रिपोर्ट चित्रपटाला टॅक्स फ्री केलं आहे. पंतप्रधान मोदींनी विक्रांत मैसी, राशी खन्ना आणि रिद्धी डोगरासह अन्य कलाकारांचं कौतुक करत म्हटलं होतं की, ही खूप चांगली गोष्ट आहे. अशा प्रकारे सत्य समोर येत आहे. या घटनेला सामान्य माणूसही पाहू शकतो.
हे ही वाचा >> Mohit Kamboj : "जिथे असशील तिथून उचलून आणू...", मोहित कंबोज यांचा थेट इशारा, कोण आहे गजाभाऊ?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, यामध्ये चित्रपटाच्या बाबतीत महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. पोस्टमध्ये दावा केला आहे की, द साबरमती रिपोर्ट या चित्रपटाला पाहण्याची आवश्यकता का आहे? या प्रश्नाला हायलाईट करून चित्रपटाबाबत माहिती देण्यात आली होती.
केव्हा प्रदर्शित झाला चित्रपट?
धीरज सरना दिग्दर्शित चित्रपट द साबरमती रिपोर्ट 2002 च्या दु:खद घटनेवर आधारित आहे. ज्यामुळे गुजरातच्या अनेक भागात दंगली घडल्या होत्या. विक्रांत मैसी स्टारर हा चित्रपट 15 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला होता.
हे ही वाचा >> Solar Eclipse 2025 : कधी आहे सूर्यग्रहण? भारतात दिसणार अद्भूत दृष्य; घरबसल्या कसं पाहाल?
गोधरा ट्रेन घटना काय आहे?
27 फेब्रुवारी 2002 ला सकाळच्या सुमारास साबरमती एक्स्प्रेस निर्धारित वेळेवर गुजरातच्या गोधरा स्टेशनवर पोहोचली. बिहारच्या मुजफ्फरपूरपासून गुजरातच्या अहमदाबादपर्यंत चालणाऱ्या या ट्रेनमध्ये शेकडो प्रवासी होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात कारसेवकही होते. हे कारसेवक अयोध्येतील हिंदू स्वयंसेवक होते. जेव्हा ट्रेन गोधरावरून रवाना झाली. त्यावेळी ट्रेनची एमरजन्सी चैन अनेकदा खेचण्यात आली होती. त्यानंतर ट्रेन सिग्नलजवळ थांबली. त्यानंतर ट्रेनवर हल्ला झाला. जवळपास 2000 लोकांच्या गर्दीने ट्रेनवर दगड फेकले आणि चार डब्ब्यांमध्ये आग लावली.
ADVERTISEMENT