'आर्ची'ला भेटला खऱ्या जीवनातील 'परशा'! रिंकू राजगुरू होणार भाजप खासदाराची सून, 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण

Rinku Rajguru And krishnaraaj Mahadik Viral Photo :   सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचणारी आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू आता लग्नबंधनात अडकणार आहे, अशा चर्चांना सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

Rinku Rajguru And krishnaraaj Mahadik Viral Photo

Rinku Rajguru And krishnaraaj Mahadik Viral Photo

मुंबई तक

11 Feb 2025 (अपडेटेड: 11 Feb 2025, 06:21 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

रिंकू राजगुरु अडकणार लग्नबंधनात?

point

भाजप खासदाराच्या मुलाने केला रिंकुसोबतचा फोटो शेअर

point

रिंकूच्या लग्नाबाबत नेटकऱ्यांनी केला प्रतिक्रियांचा वर्षाव

Rinku Rajguru And Krishnaraaj Mahadik Viral Photo :  'सैराट झालं जी..' हे गाणं कानावर पडताच आर्ची अन् परशा डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहत नाहीत. सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचणारी आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू आता लग्नबंधनात अडकणार आहे, अशा चर्चांना सोशल मीडियावर रंगल्या आहेत. रिंकू आता भाजप खासदार धनंजय महडिक यांचे धाकटे चिरंजीव युट्यूबर आणि उद्योजक कृष्णराज महाडिकशी लग्नबंधनात अडणार असल्याचं नेटकरी म्हणतायत. खुद्द कृष्णराज महाडिकने रिंकूसोबतचा एक फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर कृष्णराजने रिंकूसोबतच फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय.

हे वाचलं का?

कृष्णराजने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रिंकूसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'महाडिकांच्या घरी तिसरी सून येणार आहे', 'रिंकू कोल्हापूरची सून होणार', अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी कृष्णराज आणि रिंकूच्या फोटोवर दिल्या आहेत. कृष्णराज आणि रिंकू राजगुरूने करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे नुकतंच दर्शन घेतलं. तसच रिंकूने कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या ‘राजर्षी शाहू महोत्सवात’ उपस्थितीही दर्शवली होती. कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर योगायोगाने कृष्णराज आणि रिंकूची भेट झाली. या भेटीनंतर कृष्णराजने इंटरनेटवर फोटो शेअर केला अन् दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं.

हे ही वाचा >> Jitendra Awhad : "सुरेश धस यांना मराठा समजात फूट पाडायला आणि जरांगेंना कापायला पाठवलंय"

रिंकू आणि कृष्णराज यांच्या लग्नाच्या केवळ चर्चाच आहे. यात कोणतंही तथ्य नसल्याचं सांगितलं जात आहे. कारण कृष्णराजने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी दोघांच्या लग्नाबाबतच्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. दोघांकडून लग्नाबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही. तसंच त्यांच्या कुटुंबाकडूनही त्यांच्या लग्नाबाबत जाहीर करण्यात आलं नाहीय. रिंकू राजगुरुही सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय राहते. रिंकू तिचं हटके लूक आणि सुंदर आऊट्सफीट्सचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. 

हे ही वाचा >> Sambhajinagar : शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची पोलिसांना धक्काबुक्की, हॉटेल चालकाला मारहाण


 

    follow whatsapp