Padma Award 2025 : केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीय. देशभरात उद्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. अशातच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केलीय. राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या भाषणात हे पुरस्कार जाहीर केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गज व्यक्तींचा या पुरस्काराच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. तसच स्वातंत्र्यसैनिक, शेतकरी, पॅरालिम्पियनमध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
यामध्ये राज्यातील तीन दिग्गज व्यक्तींचा समावेश आहे. होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे, मारुती चित्तमपल्ली यांच्यासह चैत्राम पवार यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय. तसच डॉ. नीरजा भाटला, शैली होळकर, भिमसिंह भावेश, पी. दत्वनमूर्ती, एल एँगथिंग, जगदीश जोशीला, सेनानी लिबिया लोबो सरदेसाई, हरविंदर सिंग, भैरूसिंग चौहान, शेखा एजे अल सबा, हरविंदर सिंग यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हे ही वाचा >> Eknath Shinde: "माझ्या मतदारांना त्रास देण्याचा प्रयत्न कराल, तर गाठ माझ्याशी...", उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
"या पुरस्काराने खूप खूप आनंद झालाय"
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.पर्यावरणाशी संबंधित लेखन करणारे साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी पर्यावरण विषयक 20 हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. विशेष म्हणजे त्यांनी प्राणी, पक्ष्यांची डिक्शनरी लिहिली आहे. त्यासोबतच त्यांनी वनाधिकारी म्हणूनही काम केलं आहे. निसर्ग, पर्यावरणाशी नाळ जोडलेला साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे.पुरस्कार जाहीर झाल्यानं अतिव आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.पुरस्कार जाहीर झाल्याचं समजताच मी निशब्द झालो, अशा भावना त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या आहेत.
हे ही वाचा >> Navnath Waghmare : "जरांगेला अटक करा, अनेक जणांकडे रिव्हॉल्वर...", OBC नेते नवनाथ वाघमारेंनी सगळंच सांगितलं
"हा पुरस्कार मला मिळाला आहे, याचा मला आनंद आहे. हा जनतेचा पुरस्कार आहे. सेवा म्हणून मी रुग्णांवर उपचार केले आहेत", अशी प्रतिक्रिया डॉ. विलास डांगरे यांनी पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर मुंबई तकशी बोलताना दिलीय. डॉ. विलास डांगरे यांनी नागपूरच्या होमियोपॅथी चिकित्सा पद्धतीने रुग्णांवर उपचार केले आहेत. डांगरे यांनी जवळपास 50 वर्ष होमियोपॅथीच्या माध्यमातून मोठे आजार बरे केले आहेत. तसच डांगरे आरएसएसचे स्वयंसेवकही आहेत.
ADVERTISEMENT
