Govardhan Puja 2024 Maharashtra: गोवर्धन पूजाकधी? जाणून घ्या योग्य तारीख, वेळ आणि मुहूर्त

मुंबई तक

25 Oct 2024 (अपडेटेड: 25 Oct 2024, 04:00 PM)

: गोवर्धन पूजा ही दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला साजरी केली जाते. दिवाळीच्या तारखेबाबत निर्माण झालेल्या गोंधळामुळे गोवर्धन पूजेच्या तारखेबाबतही लोकांमध्ये साशंकता आहे.

गोवर्धन पूुजेची तारीख काय?

गोवर्धन पूजा कधी साजरी करतात?

follow google news

बातम्या हायलाइट

point

गोवर्धन पूजा का साजरी केली जाते?

point

गोवर्धन पूजेच्या तारखेबद्दल संभ्रम

point

कधी असणार गोेवर्धन पूजेचा योग्य मुहूर्त

Govardhan Pooja Diwali 2024 : गोवर्धन पूजा हा दिवाळी दरम्यान येणारा एक महत्वाचा सण आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला हा सण दरवर्षी साजरा केला जातो. अनेक ठिकाणी गोवर्धन पूजेला अन्नकूट असेही म्हणतात. गोवर्धन पूजेच्या दिवशी गाईच्या शेणापासून गोवर्धन पर्वताची प्रतिकृती बनवली जाते. त्यानंतर याच पर्वताची विधीवत पूजा केली जाते. यंदा सर्वांनी दिवाळी तयारी सुरू केली आहे, मात्र गोवर्धन पूजेच्या तारखेबाबत  अद्यापही संभ्रम आहे. गोवर्धन पूजा 1 नोव्हेंबरला की 2 नोव्हेंबरला असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. त्यामुळे गोवर्धन पूजा नेमकी कधी आहे? आणि ती त्याच मुहूर्तावर का साजरी केली जाते हे जाणून घेऊ. (Govardhan Puja date Diwali 2024)

हे वाचलं का?

गोवर्धन पूजेची तारीख काय?

हे ही वाचा >>Ladki Bahin Yojana : निवडणुकीच्या गोंधळात महिलांना पुढचा हप्ता कधी मिळणार?


गोवर्धन पूजा ही दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला साजरी केली जाते. यावेळी दिवाळीच्या तारखेबाबत निर्माण झालेल्या गोंधळामुळे गोवर्धन पूजेच्या तारखेबाबतही लोकांमध्ये साशंकता आहे. पंचांगानुसार, यंदाच्या कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 6.17 पासून सुरू होईल. तर प्रतिपदा तिथी 2 नोव्हेंबरला रात्री 8.22 पर्यंत असणार आहे. उदयतिथीला हिंदू धर्मात मान्यता आहे, त्यामुळे यंदा 2 नोव्हेंबर रोजी गोवर्धन पूजा उत्सव साजरा करण्यास मान्यता असणार आहे.

 

गोवर्धन पूजेचा शुभ मुहूर्त

कुठलाही विधी किंवा पूजा ही मुहूर्तावर केल्यास त्याला एक वेगळं महत्व प्राप्त होतं. गोवर्धन पूजा करण्यासाठी असाल तर त्यासाठी शुभ मुहूर्त 2 नोव्हेंबरला संध्याकाळी असेल. संध्याकाळी 6:30 ते 8:45 या वेळेत तुम्ही गोवर्धन पूजा करू शकता. या काळात गोवर्धन महाराजांची आराधना केल्याने तुम्हाला शुभ फळ प्राप्त होतील.

 

3 नोव्हेंबरला सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत सौभाग्य योग असणार आहे. त्यामुळे सकाळी पावणेबारा वाजेची वेळ ही पूजेसाठी सर्वोत्तम वेळ असणार आहे. तसंच सकाळी 4:51 ते 5:43 वाजेपर्यंत ब्रम्ह मुहूर्त असणार आहे. त्यानंतर दुपारी 1:54 ते 2:38 वाजेपर्यंत विजय मुहूर्त असणार आहे. तर संध्याकाळी 5:34 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत गोधूली मुहूर्त असणार आहे. त्यामुळे या मुहूर्तांमध्ये भाऊबीज पूजा करण्याला जास्तीत जास्त लोकांचं प्राधान्य असणार आहे.  

    follow whatsapp