नातेवाईकांना 'Diwali Gift' द्यायचंय? 'हे' आहेत स्वस्तात मस्त दिवाळी गिफ्ट, सर्वांनाच ठरतील उपयोगी

मुंबई तक

26 Oct 2024 (अपडेटेड: 26 Oct 2024, 08:01 PM)

Diwali Gifts Ideas : दिवाळी सण-उत्सवाचा धुमधडाका येत्या 31 ऑक्टोबरला सुरु होणार आहे. दिवाळीच्या सणानिमित्त लोक एकमेकांना भेटायला त्यांच्या घरी जातात. हातात मिठाईचा बॉक्स आणि भेटवस्तू घेऊन अनेक जण नातेवाईक, मित्रांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी करतात.

Diwali Gifts Ideas

Diwali 2024 Gifts In Low Price

follow google news

बातम्या हायलाइट

point

बाजारात मिळतात 'हे' स्वस्तात मस्त आकर्षक दिवाळी गिफ्ट

point

नातेवाईकांना कोणते गिफ्ट देऊ शकता?

point

'या' भेटवस्तू खरेदी करून दिवाळी करा दणक्यात साजरी

Diwali Gifts Ideas : दिवाळी सण-उत्सवाचा धुमधडाका येत्या 31 ऑक्टोबरला सुरु होणार आहे. दिवाळीच्या सणानिमित्त लोक एकमेकांना भेटायला त्यांच्या घरी जातात. हातात मिठाईचा बॉक्स आणि भेटवस्तू घेऊन अनेक जण नातेवाईक, मित्रांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी करतात. जर दिवाळीला तुमच्या घरीही पाहुणे येत असतील, तर त्यांना स्वस्तात मस्त आकर्षक गिफ्ट देऊ शकता. दिवाळीला जवळच्या व्यक्तींना आवडत्या गोष्टी भेट म्हणून दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला दिवाळीनिमित्त स्वस्तात मिळणाऱ्या गिफ्टबाबत माहिती देणार आहोत. 

हे वाचलं का?

दिवाळीला काय देणार गिफ्ट?

जर तुम्हीही दिवाळी उत्सवानिमित्त गिफ्ट देण्याचं प्लॅन करत असाल, तर खाली दिलेल्या गिफ्टबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.

कप आणि सॉसर सेट

दिवाळीला गिफ्ट देण्यासाठी कप आणि सॉसर सेट एक जबरदस्त विकल्प होऊ शकतो. हे स्वस्तात मिळणार गिफ्ट असून आकर्षकही आहे. ज्या लोकांना क्रॉकरी वस्तू आवडतात, त्यांच्यासाठी अशाप्रकारच्या भेटवस्तू चांगला पर्याय ठरू शकतो. तुम्ही कप आणि सॉसर सेटला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने ऑर्डर करू शकता. बाजारात याची किंमत 300 रुपयांपासून सुरु असल्याचं समजते.

हे ही वाचा >> Ratan Tata Property : रतन टाटांची 10 हजार कोटींची संपत्ती कोणाला मिळाली? नाव वाचून थक्कच व्हाल

बेडशीट किंवा ब्लँकेट 

दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागणार आहे. अशातच तुम्ही नातेवाईकांना ब्लँकेट किंवा बेडशिट गिफ्ट म्हणून देऊ शकता. हे रंगीबेरंगी कलर्समध्येही उपलब्ध असतात. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना त्यांच्या आवडीचे बेडशीट किंवा ब्लँकेट भेटवस्तू म्हणून देऊ शकता. बाजारात तुम्ही याच्या वेगवेगळ्या व्हराएटी खरेदी करू शकता.

ड्रायफ्रूट्स चांगला पर्याय ठरू शकतो

दिवाळीला ड्रायफ्रूट्स देणे एक चांगला पर्याय ठरू शकतो. या सणात लोक मिठाईसोबत ड्रायफ्रूट्सही खातात. अशातच तुम्ही घरी येणाऱ्या पाहुण्यांना ड्रायफ्रूट्स गिफ्ट म्हणून देऊ शकता. विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या बजेटनुसार ड्रायफ्रूट्स खरेदी करू शकता. 

हे ही वाचा >> Ind vs Nz: मिचेल सँटनरच्या फिरकीनं टीम इंडियाला गुंडाळलं! न्यूझीलंडने भारतात पहिल्यांदाच जिंकली 'Test Series'

दिवा आणि मेणबत्ती 

दिवाळीच्या सणानिमित्त तुम्ही नातेवाईक किंवा मित्रांना दिवे किंवा मेणबत्ती गिफ्ट म्हणून देऊ शकता. बाजारात दिवे आणि मेणबत्तीचे अनेक व्हराएटी सहजपणे मिळतात. तसच तुम्ही तुमच्या बजेटमध्ये या भेटवस्तू खरेदी करू शकता. 

    follow whatsapp