04 october 2024 Horoscope : वैदिक ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं आहे. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार, राशी भविष्याची माहिती दिली जाते. आज 04 ऑक्टोबर 2024 रोजी शुक्रवार आहे. शुक्रवारचा दिवस देवीला समर्पित असतो. त्याचबरोबर आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे, त्यामुळे देवी ब्रह्मचारिणीची पूजा करण्यासाठी हा खूपच शुभ दिवस आहे. दुर्गा मातेची पूजा-उपासना केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि सुख-समृद्धी मिळते. ज्योतिष गणनेनुसार आजच्या दिवशी कोणत्या राशींना लाभ होणार आहे आणि कोणत्या राशींना समस्यांचा सामना करावा लागणार आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
ADVERTISEMENT
मेष राशी
आशा-निराशेचे भाव मनात असू शकतात. कौटुंबिक जीवनात कष्ट घ्यावे लागतील. आर्थिक खर्च वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. पैशांच्या स्थितीत सुधारणा होईल. आत्मविश्वास कमी होईल.
वृषभ राशी
आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रयत्न करा. नोकरीत प्रगती होईल. कौटुंबीक समस्या निर्माण होऊ शकतात. आत्मविश्वास भरपूर राहील.
मिथुन राशी
मनाची चलबिचल होईल. कुटुंबात धार्मिक किंवा मांगलिक कार्याला सुरुवात होईल. आरोग्याची काळजी घ्या. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. खर्चात वाढ होईल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.
कर्क राशी
कुटुंबाचं सहकार्य लाभेल. कामकाजात प्रगती होईल. वाणीत गोडवा निर्माण होईल. मन अशांत राहील. नोकरीत जबाबदारी वाढू शकते. आत्मविश्वास वाढेल.
सिंह राशी
आळशी होऊ शकता. एखाद्या मित्राच्या सहकार्यामुळं कार्यात लाभ होईल. मेहनत खूप घ्यावी लागेल. आईच्या आरोग्याबाबत चिंता राहील. धनप्राप्तीचा योग येऊ शकतो.
कन्या राशी
मनात नकारात्मक उर्जा निर्माण होऊ शकते. रागाने कोणतच काम करू नका. कुटुंबाचं सहकार्य लाभेल. एखाद्या मित्राच्या सहकार्याने नोकरीची संधी मिळू शकते. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते.
तुळा राशी
मनात अस्वस्थता निर्माण होईल. आत्मविश्वास कमी राहील. कामाकाजात समस्या निर्माण होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. संवाद करताना समतोल ठेवा. एखाद्या मित्रासोबत मतभेद निर्माण होऊ शकतात.
वृश्चिक राशी
पार्टनरची साथ मिळेल. कुटुंबाचं सहकार्य मिळेल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. वडिलांकडून धनप्राप्तीचे योग येऊ शकतात. कौटुंबीक जबाबदारी वाढू शकते. मान-सन्मानात वाढ होईल.
धनु राशी
कामकाज सुधारण्यासाठी बहिण-भावाचं सहकार्य मिळेल. वडिलांकडूनही धनप्राप्ती होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या. शैक्षणिक कार्यात सुखद अनुभव मिळेल.
मकर राशी
मन शांत राहील. कार्यक्षेत्रात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. एखाद्या मित्राकडून धनप्राप्ती होऊ शकते. आईचं सहकार्य लाभेल. खूप खर्च होईल. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ राशी
नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. मन अशांत राहील. खर्च खूप वाढेल. मुलांच्या आरोग्यात सुधारणा होईल. मित्रांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात.
मीन राशी
घर-परिवारात धार्मिक कार्याचे योग बनू शकतात. संपत्तीत वाढ होऊ शकते. कार्य क्षेत्रात आणि नोकरीत प्रगती होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याबाबत सतर्क राहा. अनावश्यक खर्च टाळा.
ADVERTISEMENT