Pressure Cooker Safety Tips: किचनमध्ये अनेक उपकरणांचा वापर केला जातो. जेवण शिजवताना अनेक प्रकारच्या भांड्यांची आवश्यकता लागते. यामध्ये प्रेशर कुकर हे सर्वात महत्त्वाचं उपकरण आहे. किचनमध्ये प्रेशर कुकरचा उपयोग जेवण शिजवण्यासाठी होतो. कुकरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जेवण बनवलं जातं. अन्न चविष्ट बनवण्यासाठी आणि ते वेळेत शिजावं, यासाठी कुकर अत्यंत महत्वाचं उपकरण असतं.
ADVERTISEMENT
स्टीम आणि प्रेशरच्या साहाय्याने याचा वापर केला जातो. पण तुम्ही याचा योग्य प्रकारे वापर केला नाही, तर कुकरचा स्फोट होऊ शकतो. ज्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतो. कुकरचा स्फोट झाल्यास जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो. किचनमध्ये कुकरचा वापर करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही.
कुकरचा वापर करताना या गोष्टींची घ्या काळजी
किचनमध्ये कुकरचा वापर करताना अनेक लोक चूका करतात. ज्यामुळे त्यांचं खूप मोठं नुकसान होतं. यांसारख्या अनेक गोष्टींमुळे कुकरचा स्फोट होऊ शकतो. जेव्हा तुम्ही प्रेशर कुकरचा वापर कराल, त्यावेळी सर्व नियमांचं पालन करा. जेव्हा तुम्ही कुकरमध्ये अन्न शिजवता, तेव्हा ते अन्न कुकरमध्ये पूर्ण भरू नका. कुकरमध्ये प्रेशर बनवण्यासाठी त्यामध्ये पाण्याचीही आवश्यकता लागते.
हे ही वाचा >> प्रेक्षकांनो! 'Bigg Boss Marathi' पुन्हा पाहायचंय ना? फिनालेआधीच घेतला मोठा निर्णय
कुकर खराब आहे की नाही, हे सुद्धा तुम्हाला जेवण शिजवण्याआधी तपासून पाहायचं आहे. जर प्रेशर कुकरमध्ये एखादं लिकेज असेल, तर त्याचा स्फोट होऊ शकतो. तुम्ही कुकरचा वापर केला असेल, तर तुम्ही पाहिलंच असेल की कुकरचं झाकण अडकलेलं असतं. अशावेळी अनेक लोक विनाकारण ते झाकण उघडण्याचा प्रयत्न करतात. पण कुणीही असा प्रयत्न करू नये. कारण प्रेशर बाहेर आल्याने धोका निर्माण होऊ शकतो.
कुकरचा स्फोट झाल्यास हे काम करा
कुकरचा स्फोट झाल्यास लोकांच्या लक्षात येत नाही की, त्यावेळी काय करायंच. जर कुकरच्या वरच्या भागात स्फोट झाला, तर तुम्ही घाबरून जाऊ नका. सर्वात आधी तुम्ही गॅस स्टोव्हमधून गॅस बंद करा. त्यानंतर लगेच प्रेशर कुकरपासून दूर राहा. यादरम्यान तुम्ही प्रेशर कुकरला स्पर्श करू नका.
ADVERTISEMENT
