Ladki Bahin Yojana : खात्यात एक रुपया पोहोचलाच नाही, 'त्या' 16 लाख महिला अर्जदारांचं काय होणार?

मुंबई तक

08 Aug 2024 (अपडेटेड: 08 Aug 2024, 04:30 PM)

Ladki Bahin Yojana News : 1 कोटी महिला अर्जदारांमधील 15 ते 16 लाख महिला अर्जदारांच्या (Women Applicant) खात्यात 1 रूपया पोहोचलाच नाही आहे. त्यामुळे या अर्जामध्ये तुमचा अर्ज तर नाही ना? ते कसे तपासायचे हे जाणून घेऊयात.

 ladki bahin yojana 15 lakh women bank account error mukhyamantri ladki bahin yojana 2024 ajit pawar eknath shinde

1 कोटी महिलांच्या खात्यात 1 रूपया पाठवला

follow google news

बातम्या हायलाइट

point

1 कोटी महिलांच्या खात्यात 1 रूपया पाठवला

point

16 लाख खात्यांमध्ये 1 रूपया पोहोचला नाही

point

या 16 लाख अर्जात तुमचा अर्ज तर नाही ना?

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : राज्यसरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेल्या 1 कोटी महिला खातेदारांच्या (Women Account) खात्यात तांत्रिक पडताळणीसाठी 1 रूपया पाठवला होता. हा 1 रूपया अनेक महिला खातेदारांच्या खात्यात जमा झाला आहे. त्यामुळे आता त्यांच्या खात्यात 1500  रूपये जमा होण्याचा मार्ग मोकळा आहे. मात्र या 1 कोटी महिला अर्जदारांमधील 15 ते 16 लाख महिला अर्जदारांच्या (Women Applicant) खात्यात 1 रूपया पोहोचलाच नाही आहे. त्यामुळे या अर्जामध्ये तुमचा अर्ज तर नाही ना? ते कसे तपासायचे हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana 15 lakh women bank account error mukhyamantri ladki bahin yojana 2024 ajit pawar eknath shinde) 

हे वाचलं का?

महिला आणि बाल कल्याण विभागाने केलेल्या तपासणीत अनेक महिलांच्या खात्यात 1  रूपया पोहोचला नाही आहे. अशा महिला अर्जदारांची संख्या 15 ते 16 लाखाच्या घरात आहे. या महिलांनी अर्जात बँक खाते चुकीचे दिले आहे? बँक खाते बंद झाले असणार? बँक खात्यातला नंबर चुकला असणार? अर्ज दोन वेळा केले असणार? अशी अनेक कारणे असू शकतात.

हे ही वाचा : Aishwarya Rai Video : घटस्फोटाच्या चर्चेत 'बच्चन' आडनाव लावण्यावरून ऐश्वर्या काय म्हणाली?

जर तुमच्याही खात्यात 1 रूपया पोहोचला नसेल, तर या 16 लाख अर्जात तुमचाही अर्ज असण्याची शक्यता आहे. आता अशा अर्जदारांचे अर्ज पुन्हा तपासले जात आहेत. त्यासोबत महिला आणि बाल कल्याण विभागाकडून अशा खातेधारकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सूरू आहे. अशापरिस्थितीत अॅपवर किंवा वेबसाईटवर देखील तुम्हाला काही माहिती दिली गेली असण्याची शक्यता आहे. तुमचा खाते क्रमांक किंवा आयएएफसी कोड चुकीचा असल्याचा संदेश आला असेल. 

तुम्ही ज्या माध्यमातून अर्ज केला आहे, जसे या अॅपवर केला असेल, तर अॅपवर जाऊन तुम्ही तुमच्या अर्जाची माहिती घेऊ शकता. त्यात तुम्हाला खात्या संदर्भात माहिती मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही वेबसाईटवरून अर्ज केला असेल तर वेबसाईटवर जाऊन तपासा. तुमच्या अर्जाबाबत काही त्रुटी सांगण्यात आल्या आहेत. इतकचं नाही तर तुमच्या मोबाईलवरील मेसेजही तपासून घ्या. 

विशेष म्हणजे सरकार अशा अर्जदारांपर्यंत लवकरात लवकर पोहोचून त्रूटी दुर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्या 15 ते 16 लाख महिला अर्जदारांना दिलासा मिळणार आहे. 

हे ही वाचा : Agarbatti Packing Work From Home Job : घरबसल्या पॅकिंग करा अन् दर महिन्याला 40 हजार कमवा!

अजित पवार काय म्हणाले? 

''मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी उशीर होत आहे. पण महिलांना त्यांचा हक्क मिळेल. त्यासाठी कितीही रक्कम मोजावी लागली तरी चालेल.आमचा प्रयत्न आहे की,  17 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करावेत. आतापर्यंत सव्वा कोटी महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. 17 तारखेपर्यंत हा आकडा दीड ते दोन कोटींवर जाईल. कालच मी 6000 कोटी रूपयांच्या  फाईलवर सही करून आलो आहे. ते पैसै तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. या पैशातून तुमच्या स्वत:साठी काहीतरी घ्या'', असे आवाहन अजित पवारांनी महिलांना केले आहे. 

    follow whatsapp