Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ना शिंदे सरकारचं आणखी मोठं गिफ्ट, काय मिळणार मोफत?

मुंबई तक

26 Jul 2024 (अपडेटेड: 26 Jul 2024, 02:45 PM)

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली होती. महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून, यासाठी त्यांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यानुसार मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना सूरू केली जात आहे.

ladki bahin yojana beneficiaries will get 3 gas cylinder free mahayuti government soon will issu gr mukhymantri majhi ladki bahin yojana eknath shinde

राज्य सरकारने महिलांसाठी आणखी एक महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्य सरकार महिलांसाठी आणखी एक महत्वपुर्ण निर्णय घेणार आहे.

point

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना तीन सिलिंडर मोफत मिळणार

point

लवकरच या संदर्भात शासकीय आदेश काढला जाणार आहे.

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme : राज्य सरकारने लाडक्या बहीण योजनेची घोषणा केल्याने 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात आता दरमहा 1500 रूपये जमा होणार आहेत. या योजनेची चर्चा असतानाच आता राज्य सरकारने महिलांसाठी आणखी एक महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार आता लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांना वर्षाला तीन सिलिंडर   (Cylinder Free)मोफत मिळणार आहेत. लवकरच या संदर्भात शासकीय आदेश काढला जाणार आहे. या निर्णयाने महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. (ladki bahin yojana beneficiaries will get 3 gas cylinder free mahayuti government soon will issu gr mukhymantri majhi ladki bahin yojana eknath shinde) 

हे वाचलं का?

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली होती. महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून, यासाठी त्यांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यानुसार मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना सूरू केली जात आहे. या योजनेतील पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. राज्यातील 52 लाख 16 हजार 412 कुटुंबियांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, असे अजित पवारांनी सांगितले होते. 

हे ही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana: शेवटच्या तारखेआधीच महिलांना मिळणार 3000 रुपये, नेमके कसे?

आता राज्य सरकारने अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवून लाडक्या बहिणींना त्यामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वर्षाला तीन सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून या संदर्भातला प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला आहे. त्यामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीची तयारी देखील सूरू झाली आहे.

उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र सरकार एका सिलिंडरमागे 300 रूपये अनुदान देते. तर एका गॅस सिलिंडरची बाजारातील सरासरी किमंत 830 रूपये धरून प्रत्येक लाभार्थ्यांला प्रति सिंलिंडर 530 रूपये याप्रमाणे तीन सिलिंडरच्या मर्यादेत अनुदान देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला होता. केंद्राची  योजना राबविल्यास त्याचा महायुती सरकारला लाभ मिळणार नाही. त्यामुळे राज्याची स्वतंत्र योजना म्हणून राबविण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळासमोर मांडली आहे. लवकरच या संदर्भात शासकीय आदेश काढला जाणार असल्याची माहिती आहे. 

खात्यात पैसै कधी जमा होणार?

लाडक्या बहीण योजनेचा पहिला हफ्ता जमा करण्यासाठी सरकारने रक्षाबंधनाचा मुहूर्त साधला आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात 19 ऑगस्ट 2024 रोजी योजनेचे पैसे जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 हजार रुपये जमा केले जाणार आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

हे ही वाचा : उघड्यावर लघवीला गेला अन् Pit Bull Dog ने वकिलाच्या प्रायव्हेट पार्टवर...

माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने एका वर्षासाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. त्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक असून, उत्पन्न दाखला नसेल, तर पिवळे वा केशरी रेशन कार्डही ग्राह्य धरले जाणार आहे. 

    follow whatsapp