Ladki Bahin Yojana : महिलांनो, 'ही' शेवटची संधी! तुमचे 4500 खात्यात आले का?

मुंबई तक

• 02:50 PM • 30 Sep 2024

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा व्हायला सूरूवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात 4500, तर अनेकांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले आहेत. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे. पण अनेक महिलांचा अर्ज मंजूर होऊन देखील खात्यात पैसेच जमा झाले नाहीयेत.

ladki bahin yojana scheme third installment women account does not deposite money aditi tatkare ajit pawar eknath shinde mukhyamantri ladki bahin yojana scheme

अनेक महिलांच्या खात्यात पैसेच जमा झाले नाहीयेत.

follow google news

बातम्या हायलाइट

point

तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा

point

पैसे खात्यात जमा होण्याची शेवटची संधी

point

तुमच्या खात्यात पैसे आले का?

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme, Third Installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा व्हायला सूरूवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात 4500, तर अनेकांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले आहेत. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे. पण अनेक महिलांचा अर्ज मंजूर होऊन देखील खात्यात पैसेच जमा झाले नाहीयेत. त्यामुळे या महिलांना मोठा धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत महिलांनी नेमकं काय करावं हे, जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme third installment women account does not deposite money aditi tatkare ajit pawar eknath shinde mukhyamantri ladki bahin yojana scheme)  

हे वाचलं का?

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर तिसऱ्या टप्प्यात कशाप्रकारे निधी हस्तांतरण झाले आहे, याची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली आहे. त्यानुसार  25 सप्टेंबर रोजी 34,34,388 भगिनींना 1545.47 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे. आणि 26 सप्टेंबर रोजी 38,98,705 भगिनींना 584.8 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे.

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 'या' तारखेपर्यंत 4500 खात्यात होणार जमा

तसेच 29 सप्टेंबर रोजी 34,74,116 भगिनींना 521 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच ज्या महिलांना ऑगस्टमध्ये लाभ मिळाला होता त्यांच्या तिसरा हप्ता देण्यात आला आहे. आणि ज्यांना तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर) देण्यात आले आहेत, असे देखील आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. 

यासह अद्याप ज्या महिलांच्या खात्यात पैसेच जमा झाले नाहीयेत. त्या महिलांना देखील आदिती तटकरे यांनी दिलासा दिला आहे. ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसे आले नाहीयेत, त्या महिलांच्या लाभ हस्तांतरणाचे प्रक्रिया  युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यानुसार आज 30 सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांकडे ही शेवटची संधी असणार आहेत. जर या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. तर महिलांना निधीपासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे. 

    follow whatsapp