Mazi Ladki Bahin Yojana: 1500 रुपयांसाठी तुमच्या अर्जासमोर नेमकं काय असायला हवं?

मुंबई तक

• 10:37 PM • 08 Aug 2024

Mazi Ladki Bahin Yojana Approval status : माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर झाली आहे. पण अर्जदार महिलेला 1500 रुपये मिळणार की नाही हे एका गोष्टीवरूनच निश्चित होणार आहे.

1500 रुपयांसाठी तुमच्या अर्जासमोर नेमकं काय असायला हवं?

1500 रुपयांसाठी तुमच्या अर्जासमोर नेमकं काय असायला हवं?

follow google news

बातम्या हायलाइट

point

माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जाचे स्टेट्स प्रकार जाणून घ्या

point

अर्जासमोर नेमका कोणता शेरा असणं महत्त्वाचं?

point

माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जात 4 स्टेट्स

Mazi Ladki Bahin Yojana Approval status: मुंबई: माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये कोट्यवधी महिलांचे अर्ज हे पात्र ठरले आहेत. मात्र, अर्जदार महिलेला 1500 रुपये मिळणार की नाही हे अर्जाच्या समोर असणाऱ्या एका स्टेट्सवरुन निश्चित होणार आहे. सरकारकडून जी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये अर्जाची स्थिती काय आहे हे आपल्याला जाणून घेता येणार आहे. (mazi ladki bahin yojana what exactly should be at the front of your application for rs 1500)

हे वाचलं का?

स्टेट्सचे प्रकार

1. प्रलंबित स्थिती (Pending Status)- जर तुमची अर्जाची स्थिती अजूनही प्रलंबित म्हणून दर्शवत असेल, तर याचा अर्थ तुमच्या अर्जाची छाननी प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे.

2. रिजेक्ट स्टेटस (Reject Status) - जर तुमच्या अर्जाची स्थिती Reject दिसत असेल, तर याचा अर्थ तुमचा अर्ज सरकारने रद्द केला आहे.

3. पुनरावलोकन स्थिती (Review Status) - जर तुमच्या अर्जाची स्थिती Review म्हणून असेल, तर याचा अर्थ असा आहे की, सरकार तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन करत आहे.

4. मंजुरीची स्थिती (Approval Status) - जर तुम्ही तुमचा अर्ज तपासला गेला आणि त्याची स्थिती Approval असेल, तर याचा अर्थ तुमच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून तो अर्ज स्वीकारला गेला आहे. 

हे चार अर्जाचे स्टेट्सचे प्रकार आहेत. ज्यापैकी मंजुरीची स्थिती म्हणजेच Approval Status असलेल्या अर्जदार महिलांनाच शिंदे सरकारकडून 1500 रुपये मिळणार आहे.

हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Yojana List 2024 PDF: माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर, कशी करणार PDF डाऊनलोड?

ज्या महिलांच्या अर्जासमोर प्रलंबित स्थिती किंवा पुनरावलोकन स्थिती असा शेरा असेल त्या महिलांना 1500 रुपये खात्यात येण्यासाठी नक्कीच काही काळ वाट पाहावी लागेल. 

लाडकी बहीण योजनेचा अर्ज प्रलंबित का दिसतो?

लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही पूर्णपणे योग्य पद्धतीने भरला असेल आणि तरीही तो प्रलंबित असेल तर काहीही काळजी करण्याची गरज नाही. कारण सध्या तुमचा अर्ज हा शासकीय प्रक्रियेत असून त्यावर शासनाची कार्यवाही सुरू आहे. अर्ज तपासण्याची प्रक्रिया सुरू असल्याने अर्ज प्रलंबित असल्याचे दाखवले जात आहे. त्यामुळे धीर धरा अजिबात घाई करू नका.

...तर या महिलांना 15000 रुपये मिळणार नाही

राज्यातील कोट्यवधी महिलांना माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत. पण या सर्व अर्जांची आता छाननी होत आहे. अशावेळी ज्या अर्जासमोर Reject Status दिसेल ते अर्ज नाकारण्यात आले आहेत असा त्याचा अर्थ होईल. म्हणजेच त्या महिलांना शिंदे सरकारकडून देण्यात येणारे 1500 रुपये मिळू शकणार नाही.

    follow whatsapp