Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! खात्यात 4500 जमा होणार की 1500? आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Mazi Ladki Bahin Yojana Latest News: माझी लाडकी बहीण योजनेबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. अनेक महिलांना तिसऱ्या हफ्ताच्या पैशांची प्रतिक्षा लागली आहे. खात्यात पैसे कोणत्या तारखेला जमा होतील? असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे.

Aaditi Tatkare On Mazi Ladki Bahin Yojana

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

मुंबई तक

• 10:02 AM • 24 Sep 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याचे पैसे कधी मिळणार?

point

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

point

'त्या' महिलांच्या खात्यातच योजनेचे पैसे जमा होतील

Mazi Ladki Bahin Yojana Latest News: माझी लाडकी बहीण योजनेबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. अनेक महिलांना तिसऱ्या हफ्ताच्या पैशांची प्रतिक्षा लागली आहे. खात्यात पैसे कोणत्या तारखेला जमा होतील? असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे. अशात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचं आदिती तटकरे म्हणाल्या आहेत. (New information has come to light regarding ladki Bahin Yojana. Many women have been waiting for the third week Installment)

हे वाचलं का?

आदिती तटकरे यांनी दिलेली माहिती अशी की, या महिना अखेरपर्यंत 23 ते 28 सप्टेंबर दरम्यान सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात या योजनेचा तिसरा हफ्ता जमा होणार आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांचे अर्ज पात्र ठरले, पण त्यांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नाहीत, अशा महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा होतील. तर ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला आहे, त्या महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत. 

हे ही वाचा >> Horoscope In Marathi : या राशीच्या लोकांच्या घरात सुख-शांती नांदेल! पण काहींच्या जीवनात साडेसाती, कारण...

राज्य सरकारने महिलांचं कल्याण व्हावं आणि त्यांना आर्थिक सहाय्य मिळावं, यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची रक्कम दिली जात आहे. 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न अडीच लांखापेक्षा कमी आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याचे पैसे 15 सप्टेंबर 2024 पूर्वी जमा करण्यात येणार होते.

परंतु, अजूनही लाखो महिला अशा आहेत, ज्यांनी नुकतच या योजनेसाठी अर्ज भरला आहे. आता त्यांचे अर्ज तपासण्यात येत आहेत. त्यानंतर सर्व महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील. ज्या महिलांनी अजूनही अर्ज दाखल केला नाही, त्या महिला 30 सप्टेंबरपूर्वी अर्ज भरू शकतात. लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता 14 ऑगस्ट 2024 ला रक्षाबंधनाच्या उत्सवादरम्यान देण्यात आला होता.

हे ही वाचा >> Maharashtra weather: राज्यात धो-धो सुरूच! 'या' भागांना काढणार झोडपून, IMD अलर्ट

त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या हफ्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. आता या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं तिसरा हफ्ता देण्यात येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांची लिस्ट तयार करण्यात आली आहे. ज्या महिलांचा नाव या लिस्टमध्ये आहे, त्या सर्वांना तिसऱ्या हफ्त्याचे पैसे लवकरच मिळणार आहेत. 
 

    follow whatsapp