UPI ID Updates: यूपीआय यूजर्ससाठी मोठी बातमी! 'या' अक्षरांची UPI आयडी 1 फेब्रुवारीपासून होणार ब्लॉक, NPCI ने बदलला नियम

UPI IDs big updates : यूपीआयने पेमेंट करणं सध्याच्या घडीला एक सामान्य गोष्ट बनली आहे. ई-रिक्शापासून मेट्रो ट्रेन आणि भाजांच्या दुकानांपर्यंत UPI च्या माध्यमातून पेमेंट केलं जातं.

Unified Payment Interface Big Update

Unified Payment Interface Big Update

मुंबई तक

31 Jan 2025 (अपडेटेड: 31 Jan 2025, 06:16 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

UPI यूजर्ससाठी सर्वात मोठी अपडेट

point

NPCI च्या गाईडलाईन्स काय आहेत?

point

1 फेब्रुवारीपासून ते यूपीआय आयडी होणार बंद

UPI IDs big updates : यूपीआयने पेमेंट करणं सध्याच्या घडीला एक सामान्य गोष्ट बनली आहे. ई-रिक्शापासून मेट्रो ट्रेन आणि भाजांच्या दुकानांपर्यंत UPI च्या माध्यमातून पेमेंट केलं जातं. आता यूपीआय पेमेंटबाबत एक मोठी अपडेट आली आहे. यामुळे काही वेळा तुम्हाला पेमेंट करता येणार नाही. जर तुम्हीही यूपीआय पेमेंट करत असाल, तर तुम्हाला यासंदर्भातील नव्या नियमाबाबत माहित असलं पाहिजे. एनपीसीआई 1 फेब्रुवारीपासून काही ट्रान्जॅक्शन ब्लॉक करणार आहे. 

हे वाचलं का?

एनपीसीआयने याबाबत परिपत्रक जारी करून माहिती दिलीय की, 1 फेब्रुवारीपासून स्पेशल कॅरेक्टर्सने बनवलेले ID ट्रान्जॅक्शन स्वीकारले जाणार नाहीत. यूजर्स फक्त अल्फान्यूमेरिक कॅरेक्टर्सच्या माध्यमातून बनवलेल्या ID नुसारच ट्रान्जॅक्शन स्वीकारले जातील. जे लोक या नियमांचं पालन करणार नाहीत, अशा लोकांची आयडी ब्लॉक केली जाईल. 

हे ही वाचा >> Sanjay Raut: "काही काळ थांबावं लागेल...", राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत करत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

NPCI च्या गाईडलाईन्स काय आहेत?

NCPI चे हे निर्देश 1 फेब्रुवारी 2025 पासून बदलणार आहेत. एनपीसीआयने यूपीआय यूपीआय वापरकर्त्यांना स्पष्ट सांगतिलं आहे की, त्यांनी UPI ट्रन्जॅक्नश आयडीसाठी अल्फान्यूमेरिक कॅरेक्टरचा वापर सुरु केला पाहिजे. नाहीतर सेंट्रल सिस्टम त्या अॅपने कोणत्याही यूपीआय ट्रान्जॅक्शनला परवानगी देणार नाही.  या ट्रान्जॅक्शनचं पालन करण्याची जबाबदारी पेमेंट अॅपवर आहे.

हे ही वाचा >> Dhananjay Munde : "भगवानगडाच्या पाठिंब्यामुळे मोठी ताकद मिळाली, आत्मविश्वास वाढला"

भारतात वर्ष 2016 मध्ये झालेल्या नोटबंदीनंतर डिजिटल पेमेंट वेगाने सुरु झालं. याशिवाय परदेशातही यूपीआय ट्रान्जॅक्शन होत आहेत. श्रीलंका, भूटान, यूएई, मॉरिशस आणि फ्रान्समध्ये यूपीआय ट्रान्जॅक्शन होत आहेत. नॅशनल पेमेंट्स इंटरफेस ऑफ इंडियाने याआधीही लोकांच्या यूपीआयआयडीसाठी स्पेशल कॅरेक्टर्सच्या जागी अल्फान्यूमेरिक कॅरेक्टर्सचा वापर करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर अनेक लोकांनी याचा वापर करणं सुरु केलं. 

    follow whatsapp