Kitchen Tips : कच्चे अंडे किती वेळ उकडले पाहिजे? अंडी उकडण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या

3-3-3 Method For Eggs : हिवाळ्यात लोक खूप अंडे खातात. विशेषत: सकाळच्या नाश्त्यात अंड्यांचा समावेश केला जातो. काही लोक अंडे उकळून खातात. तर काही माणसं अंड्यांचे वेगवेगळे पदार्थ बनवतात.

Egg Boiling Best Method

Egg Boiling Best Method

मुंबई तक

09 Jan 2025 (अपडेटेड: 09 Jan 2025, 08:51 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अंडी उकडण्याची 3-3-3 मेथड आहे तरी काय?

point

कच्ची अंडी किती वेळ उकडली पाहिजेत?

point

अंडी उकडण्याची योग्य पद्धत कोणती?

3-3-3 Method For Eggs : हिवाळ्यात लोक खूप अंडे खातात. विशेषत: सकाळच्या नाश्त्यात अंड्यांचा समावेश केला जातो. काही लोक अंडे उकळून खातात. तर काही माणसं अंड्यांचे वेगवेगळे पदार्थ बनवतात. पण सकाळी सकाळी अंडी उकडणे सोपं नसतं. अंडी उकळायला वेळ लागतो आणि अनेकदा ही अंडी चुकीच्या पद्धतीनं उकडली जातात. त्यामुळे अंडी उकडताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही अंडी उकडण्यासाठी 3-3-3 मेथडचा वापर करू शकता. यामुळे तुम्ही सर्व अंडी योग्य पद्धतीत उकडू शकता. अंडी उकडण्याची योग्य पद्धत कोणती, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

हे वाचलं का?

काय आहे अंड्यांची 3-3-3 मेथड?

अंडी उकडण्यासाठी ही पद्धत खूप फेमस आहे. यानुसार तीन मिनिटांसाठी अंड्यांना प्रेशर कुकरमध्ये उकडा. तीन मिनिट तसच बाहेर ठेवा आणि गॅस थंड होऊ द्या. त्यानंतर अंड्यांना बर्फाच्या पाण्यात टाका. त्यानंतर तीन मिनिटांनी अंडी सोलून घ्या. त्यानंतर तुम्हाला दिसेल की, अंडी पूर्णपणे उकडली आहेत आणि योग्य पद्धतीत ही अंडी शिजली आहेत. 

हे ही वाचा >>  Optical Illusion : पोपटांमध्ये लपलाय खतरनाक सरडा! पोपटपंची करणारे नाही, दिमाग लावणारेच 7 सेकंदात शोधतील

कच्ची अंडी किती वेळ उकडली पाहिजेत?

6 मिनिटापर्यंत अंडी उकडल्याने सफेद पार्ट योग्य पद्धतीत शिजतो.
टोस्टसाठी अंडे किंवा सॅलडसाठी 8 मिनिटांपर्यंत अंडी उकडणे योग्य
10-12 मिनिटे अंडी उकडल्यानंतर तुम्ही त्या अंड्यांची करी बनवू शकता. 

अंडी उकडण्याची योग्य पद्धत 

अंड्याला एका पातेळ्यात टाका. त्यानंतर व्हाईट व्हिनेगार टाकून पाच ते आठ मिनिटांपर्यंत अंडी शिजवा. अंडी उकडत असताना अंड्यावर असलेली सफेद कवटीला तडे गेले की, अंडी पूर्णपणे शिजली आहेत, असं समजू शकता. असं केल्याने अंडा योग्य पद्धतीत शिजलेला असेल.

हे ही वाचा >> Ajit Pawar: अजितदादा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाहीच; पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?

अंडी खाण्याचे फायदे

उकडलेली अंडी खाल्ल्याने शरीरास पोषक तत्व तर मिळतातच. पण मोठ्या प्रमाणात प्रथिनेही मिळतात. अंड्याचा सफेद रंगाचा भाग खाल्ल्याने शरीराला कॅल्शियम मिळतं. तसच अंड्यातील पिवळ्या रंगांचा भागही थोड्या प्रमाणात सेवन करू शकतात. अंड्यातील पिवळ्या भागात हेल्दी फॅट्स आणि प्रोटिन असतं. 

    follow whatsapp