Best Time To Eat Dates : सकाळी की रात्री? खजूर खाण्याची योग्य वेळ कोणती? माहित नसेल तर होईल मोठं नुकसान

Know The Correct Time To Eat Dates : खजूर खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. यामध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक तत्व असतात. हे शरीरासाठी फायदेशीर असतात. खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये खजूराचा उपयोग अनेक प्रकारे केला जातो.

Correct Time To Eat Dates

Correct Time To Eat Dates

मुंबई तक

• 09:58 PM • 10 Mar 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

खजूर खाल्ल्याने आरोग्यास कोणते फायदे मिळतात?

point

वर्कआऊटच्या आधी की नंतर? खजूराचं सेवन कधी करावं?

point

खजूर खाण्याच्या योग्य वेळेबाबत जाणून घ्या सविस्तर

Know The Correct Time To Eat Dates : खजूर खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. यामध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक तत्व असतात. हे शरीरासाठी फायदेशीर असतात. खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये खजूराचा उपयोग अनेक प्रकारे केला जातो. खजूर स्मूदी, ओटमील किंवा सलादसोबत खाऊ शकता. खजूर केव्हा आणि कधी खायला पाहिजे? तुम्हाला माहित आहे का? तुम्हाला याबाबत माहिती नसेल, तर आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर सांगणार आहोत. योग्यवेळी खजूराचं सेवन केल्याने ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. जर चुकीच्या वेळी खजूर खाल्ल तर यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. अशातच खजूर खाण्याची योग्य वेळ कोणती? याबाबत जाणून घ्या सविस्तरपणे.

हे वाचलं का?

खजूर केव्हा खाल्ल नाही पाहिजे?

खूप जेवण केल्यानंतर लगेच खजूर खाऊ नये. यामुळे अपचन, एसिडिटी किंवा गॅससारखी समस्या निर्माण होऊ शकते. रात्रीच्या वेळी खूप जास्त प्रमाणात खाल्ल नाही पाहिजे. यामुळे वजन वाढू शकतं. खजूरात नैसर्गिक साखर असते. डाएबिटीज रुग्णांसाठी हे हानिकारक असते. 

हे ही वाचा >> Maharashtra Budget 2025: मुंबईकरांचा 'हा' प्रवास फक्त 10 मिनिटात, प्रचंड मोठी घोषणा

खजूराचं सेवन केव्हा केलं पाहिजे?

तुम्ही खजूर सकाळच्या वेळी नाश्त्यासोबत खाऊ शकता. सकाळी सकाळी खजूर खाल्ल्याने शरीरात उर्जा निर्माण होते. यामुळे मेटाबॉलिजम वेगानं वाढतं आणि पचनक्रियाही सुधारते.

वर्कआऊटच्या आधी की नंतर?

खजूराचं र्कआऊटच्या आधी किंवा नंतर दोन्ही वेळी सेवन करू शकता. खजूरामध्ये नैसर्गिक साखर असते. यामुळे व्यायामाच्या वेळी एनर्जी मिळते. 

झोपण्याआधी खजूराचं सेवन करा

तुम्ही रात्री झोपण्याआधी दूधात मिक्स करून खजूराचं सेवन करू शकता. रात्री खजूर खाल्ल्याने चांगली झोप लागते.

हे ही वाचा >> Maharashtra Budget 2025: अजितदादांचं Dream बजेट तुम्ही पाहिलं का? 5 वी घोषणा तर...

    follow whatsapp