Optical illusion Test: फोटोत दिसणारा प्राणी कोणता? बैल की हत्ती? एका क्लिकवर खरं उत्तर मिळेल

मुंबई तक

07 Oct 2024 (अपडेटेड: 07 Oct 2024, 04:33 PM)

What Do You See First In This Optical Illusion Photo : तामिळनाडूच्या ऐरावतेश्वर मंदिरात एक सुंदर चित्र कोरलेलं आहे. पण या चित्राकडे पाहिल्यावर अनेकांचा गोंधळ उडाल्याशिवाय राहणार नाही. कारण या चित्रात नेमका कोणता प्राणी लपला आहे, हे शोधणं खूप कठीण आहे.

Optical illusion IQ Test

Ox And Elephant Optical Illusion Photo

follow google news

बातम्या हायलाइट

point

तामिळनाडूच्या ऐरावतेश्वर मंदिरात कोरलेलं सर्वात सुंदर चित्र पाहिलं का?

point

बैल आणि हत्तीचा ऑप्टिकल इल्यूजनचा सर्वात कठीण फोटो होतोय व्हायरल

point

...तरच तुम्ही ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये यशस्वी होऊ शकता

What Do You See First In This Optical Illusion Photo : तामिळनाडूच्या ऐरावतेश्वर मंदिरात एक सुंदर चित्र कोरलेलं आहे. पण या चित्राकडे पाहिल्यावर अनेकांचा गोंधळ उडाल्याशिवाय राहणार नाही. कारण या चित्रात नेमका कोणता प्राणी लपला आहे, हे शोधणं खूप कठीण आहे. कारण एकाच चित्रात दोन प्राण्यांचे चेहरे लपले आहेत. त्यामुळे चित्रात लपलेला खरा प्राणी कोणता? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. हे चित्र वाटतं तितकं सोपं नाही, म्हणून या चित्राचा ऑप्टिकल इल्यूजनसारख्या अवघड टेस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. (A beautiful picture is carved in the Airavateshwar temple in Tamil Nadu. But looking at this picture, many will be confused. Because it is very difficult to find out which animal is hidden in this picture)

हे वाचलं का?

या फोटोला ज्या लोकांनी तीक्ष्ण नजरेत पाहिलं आहे, त्यांना या फोटोत लपलेला प्राणी ओळखता आला असेल. या फोटोत बैल लपलाय की हत्ती? या प्रश्नाचं उत्तर अशा लोकांना मिळालं असेल, ज्यांच्याकडे गरुडासारखी नजर आहे. या मंदिरात कोरलेलं चित्र इतकं सुबक आहे की, त्यामध्ये अनेक बारीक सारीक गोष्टी लपलेल्या पाहायला मिळत आहेत. पण चित्रात असलेला प्राणी बैल आहे की हत्ती? हे शोधण्यात अनेकांना अपयश आलं आहे.

हे ही वाचा >> Viral Video: खतरनाक! सजलेल्या नवरीने स्पोर्ट्स बाईकवर ठोकली Dhoom, हायवेवर पुढे काय घडलं?

99 टक्के लोक ऑप्टिकल इल्यूजनच्या या टेस्टमध्ये फेल ठरली आहेत. पण तुम्हाला या चित्रात लपलेला खरा प्राणी शोधता येईल. त्यासाठी तुम्हाला बुद्धीचा कस लावावा लागेल. @Fascinate नावाच्या यूजरने तामिळनाडूच्या या मंदिराचा फोटो ट्वीटरवर शेअर केला. या फोटोला सुंदर असं कॅप्शनही देण्यात आलं आहे. तामिळनाडूच्या ऐरावतेश्वर मंदिरातील 12 व्या शतकातील ऑप्टिकल इल्यूजन. तुम्हाला फोटोत कोणता प्राणी दिसतोय?

सततच्या कामकाजामुळं वाढलेला तणाव कमी करण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजनसारखे फोटो फायदेशीर ठरतात. ऑप्टिकलच्या सर्वच फोटो खूप इंटरेस्टिंग असतात. कारण या फोटोंमध्ये बारीक सारीक गोष्टी लपलेल्या असतात. या गोष्टी शोधण्यासाठी अनेक जण बुद्धीचा वापर करतात, पण त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. कारण फोटोत असलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी पाहण्यासाठी तीक्ष्ण नजर असणे आवश्यक असतं. 

    follow whatsapp