Baramati Yugendra Pawar: वसंत मोरे, बारामती: बारामतीत दहशतीचं आणि वेगळ्या प्रकारचं राजकारण असेल तर माझ्याशी संपर्क करा, मग मी बघतो.. असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी थेट अजित पवारांना आव्हान दिलं आहे.
ADVERTISEMENT
युगेंद्र पवार आजपासून खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी गावभेट, दौरे करत आहेत. उंडवडीत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सर्वांनी आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
हे ही वाचा> Yugendra Pawar: शरद पवारांचा नवा डाव.. सख्खा पुतण्याच करणार अजितदादांची कोंडी, कोण आहेत युगेंद्र पवार?
शरद पवार गटासोबत जोडल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याची चर्चा सध्या बारामती सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर योगेंद्र पवार यांनी प्रस्थापितांना थेट इशारा देत असं म्हटलं की, 'बारामतीत वेगळ्या प्रकारचं राजकारण होत आहे. बारामतीकरांनी असे दहशतीचं राजकारण कधी बघितलं नाही. कोणी तुम्हाला फोन करून धमकावच असेल तर थेट माझ्याशी संपर्क करा, पुढचं मी बघतो', असं म्हणत युगेंद्र पवार यांनी थेट अजित पवार यांनाच आव्हान दिलं आहे.
बारामतीत कोण मारणार बाजी?
बारामती लोकसभा मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी थेट लढत होणार आहे. ही लढत अत्यंत रंजक होणार एवढं निश्चित.. याचबाबत जेव्हा युगेंद्र पवार यांना विचारणा करण्यात आली होती तेव्हा युगेंद्र पवार म्हणालेले की, 'बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे या पराभूत होतील, असं मला वाटतं नाही. सुप्रिया सुळे यांनी खूप कामं केली आहेत. त्यामुळे त्या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, तसेच सुनेत्रा पवार बारामतीत उभ्या राहतील, असं मला वाटतं नाही. बारामती लोकसभा मतदार संघात पवार विरूद्ध पवार लढत होईल, असे मला वाटत नाही.' असे युगेंद्र पवार म्हणालेले.
राष्ट्रवादीत अजित पवार यांनी केल्या बंडावरही युगेंद्र पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर युगेंद्र पवार म्हणालेले की, 'कुठल्याही पक्षात किंवा कुटुंबात फूट पडली तर ती लोकांना आवडत नाही. कुटुंबातील व्यक्ती म्हणून मला देखील अजित पवारांचं बंड आवडलेलं नाही आहे. पक्षात असं काही होईल असे मला वाटले देखील नव्हते. कुटुंबातील सर्वच लोकांना हे आवडलं नाही आहे. असं व्हायला नको होतं..' असे युगेंद्र पवार म्हणाले होते.
हे ही वाचा> Yogendra Pawar : ''आम्ही शरद पवारांनाच साथ देणार'', अजित पवारांविरोधात सख्ख्या पुतण्याने थोपटले दंड
राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. यामध्ये दोन्ही गटाच्या आमदारांनी आणि खासदारांनी आपआपली भूमिका मांडली. मात्र पवार कुटुंबात कुणाची कुणाला साथ आहे. हे अद्याप समोर आलं नव्हतं. पण मागील काही दिवसांपासून युगेंद्र पवार यांनी त्यांची स्पष्ट भूमिका मांडली आहे. ''एक नातू म्हणून मी माझ्या आजोबांच्या (शरद पवार) सोबत आहे. आम्ही सगळे पुरोगामी विचारांचे लोक आहोत. त्यामुळेच आम्ही शरद पवारांना साथ देणार असल्याचे'' युगेंद्र पवार असं युगेंद्र पवार म्हणाले...
ADVERTISEMENT