Amit Shah : विदर्भातले सगळे दौरे रद्द, अमित शाह तातडीने दिल्लीला रवाना, नेमकं कारण काय?

मुंबई तक

17 Nov 2024 (अपडेटेड: 17 Nov 2024, 12:42 PM)

उद्या 18 नोव्हेंबर हा प्रचारासाठी शेवटचा दिवस असणार आहे. कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सगळे पक्ष करत आहेत. मात्र अमित शाहांचा दौरा रद्द झाल्यानं चर्चा होते आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

अमित शाहांच्या विदर्भातील सभा रद्द

point

अमित शाह तातडीने दिल्लीला रवाना

point

सभा रद्द करण्याच्या निर्णयामुळे चर्चा

Amit Shah Rally Cancelled : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आजच्या विदर्भातील सर्व सभा रद्द करण्यात आल्या आहेत. ते थेट नागपूरहून दिल्लीला रवाना झाले आहेत. आज अमित शहा यांची विदर्भात सभा होत्या. मात्र ते दिल्लीला रवाना झाले आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Pankaja Munde : "भाजपने बाहेरुन निवडणुकीसाठी 90 हजार लोक आणलेत, इथला ऑक्सिजन कमी झाला"

राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. उद्या 18 नोव्हेंबर हा प्रचारासाठी शेवटचा दिवस असणार आहे. कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सगळे पक्ष करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुद्धा प्रचाराच्या मैदानात आहेत. मात्र आज ते आपल्या सर्व सभा रद्द करुन दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, अमित शाह यांच्याऐवजी माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या गडचिरोली आणि वर्धा येथे सभा घेणार आहेत. उर्वरित दोन ठिकाणी अमित शहांच्या अनुपस्थितीत शिवराजसिंह चौहान सभा घेणारे आहेत.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी सुरु असलेल्या प्रचाराच्या तोफा उद्या पाच वाजता थंडावणार आहेत. तोपर्यंत होणाऱ्या सर्व राजकीय घडामोडी या निवडणुकीच्यादृष्टीनं महत्वाच्या असणार आहेत.

    follow whatsapp