Amit Shah Dhule : इंदिरा गांधी स्वर्गातून खाली आल्या तरी... धुळ्यातील भाषणात अमित शाह काय म्हणाले?

मुंबई तक

13 Nov 2024 (अपडेटेड: 13 Nov 2024, 03:58 PM)

धुळ्यात असताना अमित शाह यांनी 370 बद्दल बोलताना थेट इंदिरा गांधींचं नाव घेत काँग्रेसवर निशाणा साधला. 

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

अमित शाहांची गांधी कुटुंबावर टीका

point

टीका करताना थेच इंदिरा गांधींचाही उल्लेख

point

धुळ्याच्या सभेत काय म्हणाले शाह?

Amit Shah Dhule Sabha : अवघ्या काही दिवसांवर राज्यातल्या विधानसभा निवडणुका आल्या असून, पुढच्या दहा दिवसात त्या विधानसभा निवडणुकांचे निकालही लागलेले असतील. अशातच निवडणुका जवळजवळ येत असताना प्रचाराचा जोरही वाढत चालला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी बड्या नेत्यांची फौज सध्या महाराष्ट्राच्या मैदानात आहेत. अशातच पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सुद्धा सध्या महाराष्ट्रात आहेत. काही दिवसांपूर्वी धुळ्यात पंतप्रधान मोदींची सभा झाली होती, त्यानंतर आता आज अमित शाह आज धुळ्यात होते. धुळ्यात असताना अमित शाह यांनी 370 बद्दल बोलताना थेट इंदिरा गांधींचं नाव घेत काँग्रेसवर निशाणा साधला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Uddhav Thackeray : "वडिलांना झालेल्या वेदना मी...", रक्ताच्या नात्याबद्दल उद्धव ठाकरे सविस्तर बोलले

 

धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा इथे बोलत असताना अमित शाह म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत कलम 370 काश्मीरमध्ये लागू केलं जाणार नाही. तसंच महाविकास आघाडीवरही त्यांनी यावेळी निशाणा साधला.महाविकास आघाडीला महाविनाश आघाडी म्हणत त्यांनी निशाणा साधला. त्यामुळे तुम्हाला महायुतीच्या रुपात विकास आणणाऱ्यांना सत्तेवर आणायचं की उद्ध्वस्त करणाऱ्यांना हे तुम्हीच ठरवायचं आहे असं अमित शाह म्हणाले. राज्यात महाविकास आघाडी आली तर राज्यातला पैसा दिल्ली काँग्रेसला जाईल. मात्र महायुती आली तर शिवरायांच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी दिल्लीतून इथे पैसे येईल असं अमित शाह म्हणाले. 

 

इंदिरा गांधींचं नाव घेत काय म्हणाले शाह?


अमित शाह गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सभा घेताना 370 चा मुद्दा उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले, राहुल गांधी जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० परत लागू करण्याबद्दल बोलत आहेत, पण मी त्यांना सागेन की, राहुल गांधी तर काय पण इंदिरा गांधीही स्वर्गातून उतरल्या तरी जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत लागू करू देणार नाही.

 

चाळीसगावच्या सभेत पुन्हा गांधी कुटुंबावर निशाणा

 

काश्मीर आपला आहे की नाही? कलम 370 हटवायला पाहिजे होतं की नाही? पण आता राहुलबाबांच्या काँग्रेसने जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा आणण्याचा प्रस्ताव आणला पण मी राहुल गांधी यांना सांगू इच्छितो की तुमची चौधी पिढी आली तरी मी कलम 370 पुन्हा लागू करून देणार नाही. नेहरूजी,इंदिराजी, राजीवजी यांच्या नावाने संस्था उघडल्या. पण भाजपने उत्तर महाराष्ट्राच्या विद्यापीठाला नाव बहिणाबाई चौधरी यांचं नाव नाही दिलं असं अमित शाह म्हणाले.

    follow whatsapp