Amit Thackeray Property मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी माहीम विधानसभेतून मनसेकडून अधिकृतरित्या आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगात दाखल केलेल्या शपथपत्रात आपली संपत्ती जाहीर केली. आपल्या स्वत:च्या नावावर आणि पत्नीच्या नावावर असलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी अमित ठाकरे यांच्याकडे एकूण 12 कोटी 54 लाख रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचं जाहीर केलं आहे. तर 1 कोटी 29 लाख रुपये एवढी स्थावर मालमत्ता आहे. तसंच वेगवेगळ्या संस्थांमध्ये अमित ठाकरेंची भागीदारी, राज ठाकरेंना दिलेलं कर्ज या सर्वच गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. (Amit Thackeray Property according election commission affidavit)
ADVERTISEMENT
मनसेतून राजकारणाला सुरुवात केलेल्या अमित ठाकरे यांचा ऑपरेशन अँड टेक्निकल एक्झिक्यूटीव्ह अशा नावाने व्यवसाय आहे. अमित ठाकरे यांच्यावर 4 कोटी 19 लाख रुपयांचं कर्ज असून, 1 लाख 8 हजार रुपयांची रोख रक्कम आहे. या संपत्तीमध्ये त्यांच्या पत्नीच्या, मुलाच्या नावावर किती संपत्ती किती ते जाणून घेऊ.
अमित ठाकरेंकडील संपत्ती
ADVERTISEMENT
