Dhananjay Mahadik : लाडक्या बहिणींना थेट धमकी? धनंजय महाडिक म्हणाले, काँग्रेस रॅलीत महिला दिसल्या तर त्यांचे...

मुंबई तक

10 Nov 2024 (अपडेटेड: 10 Nov 2024, 04:28 PM)

भाजपचे कोल्हापूर दक्षिण मतदार संघाचे उमेदवार अमल महाडिक यांच्यासाठी आयोजित केलेल्या प्रचार सभेत धनंजय महाडिक हे भाषण करत होते. यावेळी धनंजय महाडिक यांनी थेट लाडक्या बहि‍णींना धमकीवजा इशारा दिला.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

लाडक्या बहिणींबद्दल पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

point

धनंजय महाडिक नेमंकं काय म्हणाले?

point

महाडिकांकडून आधी धमकी नंतर बिनशर्त माफी

Dhananjay Mahadik on Ladki Bahin : कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसमध्ये झालेल्या कलहामुळे चर्चेत आलेलं कोल्हापूर आता पुन्हा एकदा दक्षिण मतदारसंघातील भाजप नेत्याच्या भाषणामुळे चर्चेत आलंय. विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसा प्रचाराचा जोरही वाढत चालला आहे. प्रचार करताना नेत्यांची भाषणांची धारही वाढत चालली आहे. मात्र याच सर्व धामधुमीत काही नेत्यांची भाषणं ही चर्चेचं कारण ठरतात. असंच काहीसं भाजप खासदार धनंजय महाडिक यांचं झालं. भाजपचे कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक यांच्यासाठी धनंजय महाडिक हे प्रचार सभेत भाषण करत होते. यावेळी धनंजय महाडिक यांनी थेट लाडक्या बहि‍णींना धमकीवजा इशारा दिल्याचं पाहायला मिळालं. 'लाडकी बहीणचे 1500 रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नावं लिहून घ्या' असं म्हणत धनंजय महाडिक यांनी इशारा दिला. (dhananjay mahadik makes controversial remarks and warns ladki bahin beneficiaries amid vidhan sabha elections)

हे वाचलं का?

हे ही वाचा >>'आवडत असेल किंवा नसेल...', श्रीकांत शिंदेंकडून तुरुंगात असलेले भाजप नेते गणपत गायकवाडांच्या पत्नीचा प्रचार

 

अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये काल भाजपची सभा पार पडली. भाजपचे खासदार धनंजय महाडिक हे त्या सभेला उपस्थित होते. यावेळी धनंजय महाडिक यांनी भाषण करताना थेट महिलांना धमकी दिल्याचं बोललं जातंय. काँग्रेसची रॅली निघाली आणि त्यात महिला दिसल्या, तर त्यांचे फोटो काढून घ्या, घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं असं नाही चालणार असं म्हणत धनंजय महाडिक यांनी थेट धमकीच दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.


धनंजय महाडिक लाडकी बहीणबद्दल काय म्हणाले?

"तुम्हाला सांगतो, इथे काँग्रेसची रॅली निघाली आणि त्यामध्ये महिला जर दिसल्या.. ज्या 1500 रुपये घेतात आपल्या योजनेचे... त्यांचे फोटो काढून घ्या, त्यांचे नावं लिहून घ्या. म्हणजे घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं असं नाही चालणार, अनेक बाया छाती बडवायला लागल्यात, आम्हाला नको पैसे, आम्हाला सुरक्षा पाहिजे... पैसे नकोत? पैसे नकोत? राजकारण करता या पैशाचं? काँग्रेसच्या सभेत, रॅलीत महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढयचे, आम्ही व्यवस्था करु. जर कुणी लय मोठ्यानं भाषण करायला लागली, किंवा दारात कुणी आली तर, लगेच एक फॉर्म द्यायचा, बाई याच्यालर वर खाली सही कर म्हणायचं, लगेच उद्या बंद करतो पैसे... आमच्याकडं काय लई पैसे झालेले नाहीत"  

 


मी बिनशर्त माफी मागतो... : धनंजय महाडिक

"धनंजय महाडिक यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर राज्यभरातून टीका होण्यास सुरू झाल्यानंतर त्यांनी आता माफी मागितली आहे.सर्वप्रथम माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल तर त्यांची मी बिनशर्त माफी मागतो असं धनंजय महाडिक म्हणाले आहेत. "सर्वप्रथम माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल तर त्यांची मी बिनशर्त माफी मागतो. माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते. तर निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजना ही फक्त महायुती सरकारमुळेच यशस्वी झाली असल्याचे ठामपणे नमूद करताना विशेषतः वोट जिहाद करणाऱ्या महिलांच्या प्रती आलेली स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. मी माझ्या वैयक्तिक, राजकीय आयुष्यात महिलांचा नेहमीच सन्मान करत आलेलो आहे. मी आणि माझ्या पत्नीमार्फत गेली अनेक वर्षे भगीरथी महिला सस्थेमार्फत महिलांच्या आत्मनिर्भरते साठी नेहमीच चांगले काम करत आलो आहे आणि ह्या पुढे देखील करत राहीन. तीन महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरणचावत माझ्या ह्या प्रयत्नांची दखल घेऊन माझ्या वक्तव्याने मन दुखावलेल्या माझ्या भगिनी मला मोठ्या मनाने माफ करतील, अशी आई अवाचाई चरणी भी प्रार्थना करतो" असं म्हणत धनंजय महाडिक यांनी माफी मागितली.
 


 

    follow whatsapp