Vinod Tawde Video: विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई! राजन नाईक यांच्यावरही गुन्हा दाखल

मुंबई तक

19 Nov 2024 (अपडेटेड: 19 Nov 2024, 04:36 PM)

FIR On Vinod Tawde And Rajan Naik:  राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेंवर पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आलाय.

FIR On Vinod Tawde And Rajan Naik

FIR On Vinod Tawde And Rajan Naik

follow google news

बातम्या हायलाइट

point

भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेंवर मोठी कारवाई

point

राजन नाईक यांच्यावरही गुन्हा दाखल

point

नालासोपाऱ्यात नेमकं घडलं तरी काय?

FIR On Vinod Tawde And Rajan Naik:  राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेंवर पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आलाय. याप्रकरणी निवडणूक आयोगाने लोक प्रतिनिधित्व अधिनियमच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तावडेंसोबतच भाजप उमेदवार राजन नाईक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

विनोद तावडे यांनी पैसे वाटप केल्याच्या आरोपावर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिलीय. तावडे म्हणाले, माझ्याविरोधात हे षडयंत्र रचलं आहे. निवडणूक आयोगाने याची निष्पक्षपणे चौकशी केली पाहिजे. मी कार्यकर्त्यांना भेटायला गेलो होतो. मी काहीच चुकीचं केलं नाही. हे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं षडयंत्र आहे. पोलीस आणि निवडणूक आयोगाने याची चौकशी केली पाहिजे.

हे ही वाचा >> Vinod Tawde Vs Hitendra Thakur : हितेंद्र ठाकूरांकडून आधी राडा, नंतर एकाच गाडीतून तावडेंना नेलं जेवायला!

तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप

भाजपचे महासचिव विनोद तावडेंवर पैसे वाटप केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तावडेंना मुंबईच्या एका हॉटेलमध्ये पाच कोटी रुपये वाटायचे होते, असा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. यावर प्रतिक्रिया देताना विनोद तावडे म्हणाले, "मला आणि माझ्या पक्षाला बदनाम करण्याचा कट रचला आहे. सीसीटीव्ही फुटेज काढून चौकशी केली पाहिजे. मी बूथ मॅनेजमेंटच्या कामासाठी तिथे गेलो होतो. मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशिन सील कसे होतात? याची माहिती कार्यकर्त्यांना मिटिंगमध्ये देणार होतो. याचदरम्यान विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना असं वाटलं की, मी पैसै वाटत आहे. मी 40 वर्षांपासून पक्षात काम करत आहे. सत्य सर्वांनाच माहित आहे. तरीही निवडणूक आयोग आणि पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. हॉटेलमध्ये सीसीटीव्ही फुटेज आहे. यातून सर्वकाही स्पष्ट होईल". 

हे ही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 Live : आचारसंहिता भंगकेल्याप्रकरणी विनोद तावडेंवर गुन्हा!

    follow whatsapp