Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने यंदाच्या विधानसभा निव़णुकीत 81 जागांवर निवडणूक लढवली. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या घडामोडींनंतर होणारी ही निवडणूक शिंदेंसाठी आव्हानात्मक होती. शिंदेंच्या शिवसेनेने या निवडणुकीत तब्बल 57 जागा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी 36 जागांवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव केला. तर दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महाविकास आघाडीमध्ये 95 जागांवर लढून फक्त 20 जागा जिंकता आल्या. महायुतीने या निवडणुकीत 288 पैकी तब्बल 230 जागा जिंकल्या. यातल्या बहुतेक जागा मोठ्या मताधिक्क्यानं जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीच्या पदरात फक्त 46 जागा पडल्या आहेत.
ADVERTISEMENT
ठाकरे विरुद्ध शिंदेमध्ये विजय कुणाचा?
- एकनाथ शिंदे शिंदे यांच्या शिवसेनेने 81 जागा लढवून 57 जागा जिंकल्या.
- उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 95 जागांवर उमेदवार उभे करूनही केवळ 20 जागा जिंकल्या.
- एकनाश शिंदेंच्या शिवसेनेने तब्बल 36 जागांवर ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव केला.
दोन वर्षांपूर्वी जून 2022 मध्ये उद्धव ठाकरेंविरोधात बंड करून भाजपसोबत युती करणाऱ्या एकनाथ शिंदेंवर ठाकरेंच्या नेत्यांकडून मोठी टीका झाली. उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक सभेत गद्दार म्हणत निशाणा साधला होता. तसंच पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना गेल्यानंतरही त्यांच्यावर पक्ष चिन्हा चोरला असं म्हणत ठाकरेंकडून टीका होत होती. त्यातच नुकत्याच झालेल्या राज्याच्या लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये असलेल्या पक्षांचा मोठा पराभव झाला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकांमध्ये काय होतं यावर सर्वांचं लक्ष होतं. या निवडणुकांमध्ये ज्यांना यश मिळेल त्यांचाच पक्ष खरा असं म्हटलं जात होतं. त्यामुळे आपलीच शिवसेना खरी हे सिद्ध करण्याचं मोठं आव्हान शिंदेंसमोर होतं.
हे ही वाचा >>Maharashtra Assembly Election 2024 Result : लाखाच्या लीडने जिंकणाऱ्या आमदारांची यादी; अजितदादा, शिंदेंचा नंबर कितवा?
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे शिंदे हे ठाणे जिल्ह्यातील कोपरी-पाचपाखरी मतदारसंघातून 1 लाख 20 हजार 717 च्या मताधिक्क्यानं विजय मिळवला. उद्धव ठाकरेंचे उमेदवार केदार दिघेंचा त्यांनी पराभव केला. सिल्लोडमधून मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुरेश बनकर यांचा पराभव केला, तर औरंगाबाद मध्यमध्ये प्रदीप जैस्वाल यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी ग्रामीण भागात शिंदेंचे उमेदवार शंकर मोरे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या महादेव घाटाळ यांचा मोठ्या मताधिक्क्यानं पराभव केला आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT