Elon Musk : एका दिवसात 64 कोटींची मतमोजणी! ट्वीट तुफान व्हायरल; एलॉन मस्क म्हणाले, "भारतीय निवडणूक..."

मुंबई तक

24 Nov 2024 (अपडेटेड: 24 Nov 2024, 02:26 PM)

Elon Musk Tweet Viral: एका दिवसात 64 कोटींची मतमोजणी! एलन मस्क यांचं ट्वीट तुफान व्हायरल; म्हणाले, "भारतीय निवडणूक..." महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये काल 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला.

Elon Musk Tweet On Indian Election

Elon Musk Tweet On Indian Election

follow google news

बातम्या हायलाइट

point

एलॉन मस्क यांचं ट्वीट का होतंय व्हायरल?

point

भारतीय निवडणूक पद्धतीबाबत मस्क यांचं मोठं विधान

point

एलन मस्क यांनी का केलं भारताचं कौतुक?

Elon Musk Tweet Viral: एका दिवसात 64 कोटींची मतमोजणी! एलन मस्क यांचं ट्वीट तुफान व्हायरल; म्हणाले, "भारतीय निवडणूक..."
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये काल 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. यावेळी राज्यात महायुतीला मिळालेल्या बहुमताचा आकडा पाहून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या. इव्हीएमच्या मतमोजणीबाबत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असतानाच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांच्या ट्वीटचीही तुफान चर्चा रंगलीय. मस्क यांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची थेट भारतीय निवडणूक पद्धतीशी तुलना केलीय. मस्क ट्वीटरवर म्हणाले, भारताने एकाच दिवसता 64 कोटी मतांची मोजणी केली. पण अमेरिका कॅलिफॉर्नियात मतमोजणी अजूनही सुरु आहे. 

हे वाचलं का?

अमेरिकेत 5-6 नोव्हेंबरला राष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मतमोजणी सुरु करण्यात आली. परंतु, कॅलिफॉर्नियात अजूनही मतमोजणी केली जात आहे. दरम्यान, अमेरिकेच्या दुसऱ्या राज्यांत मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना विजेता घोषित करण्यात आलंय. पुढच्या वर्षी जानेवारीत ट्रम्प राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. अमेरिकेत बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया पार पडते.

हे ही वाचा >> Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : शिंदेंचे 57 शिलेदार जिंकले, किती जागांवर ठाकरेंच्या उमेदवारांना पाडलं?

ईव्हीएम मतदान यंत्रे धोकादायक असल्याने ती रद्द केली पाहिजेत. इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिन आणि पोस्टल वोटिंग खूप धक्कादायक ठरू शकतात. याला बॅलेट पेपर किंवा प्रत्यक्ष मतदानाच्या स्वरुपात बदललं पाहिजे, असंही एलॉन मस्क काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. परंतु, एलॉन मस्क यांनी भारतीय निवडणूक पद्धतीबाबत केलेलं ट्वीट प्रचंड व्हायरल झाला आहे.

हे ही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 Result : लाखाच्या लीडने जिंकणाऱ्या आमदारांची यादी; अजितदादा, शिंदेंचा नंबर कितवा?

कारण मस्क यांनी भारतीय निवडणूक विभागाचं कौतुक केलं असून अमेरिकेच्या मतदान मोजणीच्या प्रक्रियेची खिल्ली उडवली आहे. एलॉन मस्क यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने म्हटलं, भारताने एका दिवसात 640 मिलिनय मतांची मोजणी केली. तर कॅलिफॉर्नियात 15 मिलियन म्हणजेच 1.5 कोटी मतं अजूनही मोजली जात आहेत. मतदान संपून 18 दिवस पूर्ण झाले आहेत. 

    follow whatsapp