Shiv Sena UBT Candidate List: अरेरे... ठाकरेंची पहिली यादीच चुकली? राऊत म्हणाले, यादीत करेक्शन...

मुंबई तक

23 Oct 2024 (अपडेटेड: 23 Oct 2024, 08:15 PM)

Sanjay Raut on Maha Vikas Aghadi Formula : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना युबीटीने 65 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ठाकरेंची ही यादी जाहीर होण्याच्या काही मिनिटातच वाय. बी.सेंटरमध्ये महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली आहे.

 maharashtra assembly election 2024 maha vikas aghadi formula shiv sena udhhav thackeray declare first candidate list sanjay raut react correction list

ठाकरेंची पहिली यादीच चुकली?

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिवसेना युबीटीने 65 उमेदवारांची यादी जाहीर केली

point

यादीत काही चुका आहेत आणि दुरूस्ती करायची आहे,

point

संजय राऊत काय म्हणाले?

Sanjay Raut on Shiv Sena UBT Candidate List : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना युबीटीने 65 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ठाकरेंची ही यादी जाहीर होण्याच्या काही मिनिटातच वाय. बी.सेंटरमध्ये महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी यादीत काही चुका झाल्या आहेत आणि दुरूस्ती करायची आहे, असे विधान केले आहे. त्यामुळे ठाकरे गटाने यादीत दुरूस्तीच करायची होती मग ती जाहीर का केली असा सवाल आता उपस्थित होतो आहे. (maharashtra assembly election 2024 shiv sena udhhav thackeray declare first candidate list sanjay raut react correction list)  

हे वाचलं का?

वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीची आधी शरद पवारांच्या नेतृत्वात बैठक पार पडली. या बैठकीनंतर संजय राऊत, जयंत पाटील,नाना पटोले, विजय वड्डेटीवार यासह अनेक नेत्यांनी मिळून वाय. बी. सेंटरबाहेर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषेदत संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला सांगितला. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष 85-85-85 जागांवर लढणार आहे. तर आणखीण 15 सीट आहे, ज्याच्यावर महाविकास आघाडीची चर्चा सूरू आहे. आणि उरलेल्या 18 जागा या मित्रपक्षांना सोडण्यात येणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. 

हे ही वाचा : Shiv Sena UBT Candidates List: उद्धव ठाकरेंचे शिलेदार ठरले, पहिली यादी जाहीर... कोणाकोणाची नावं?

महाविकास आघाडीच जागावाटप सुरळीत पार पडलं आहे. 270 जागांवरती आमची पुर्ण सहमती झाली आहे. आणि उरलेल्या 18 जागा या मित्रपक्षांसाठी सोडल्या जाणार आहेत. या मित्रपक्षांसाठी उद्यापासून चर्चा करणार आहोत.अशाप्रकारे 288 जागांवर महाविकास आघाडी पुर्ण ताकदीन लढणार असून महाराष्ट्रात सत्तेवर येणार आहे, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 

तसेच महाविकास आघाडीची पत्रकार परिषद जाहीर होण्यापुर्वी ठाकरे गटाने त्यांची यादी जाहीर केली होती. या यादीबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, शिवसेनेच्या मुख्यालयातील यादीमध्ये काही दुरूस्ती आहेत. करेक्शन आहेत, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे जाहीर झालेल्या यादीतील काही जागांवर बदल होण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : Mahayuti : एकीकडे नवाब मलिक, दुसरीकडे प्रदीप शर्मा; 'या' दोन मतदारसंघांवरुन महायुतीत तिढा?

तसेच पत्रकार जेव्हा जागावाटपाबद्द्ल प्रश्न विचारतात, आम्ही म्हणतो 288 जागा मुद्दा क्लिअर झाला तेव्हा आम्ही तो अत्यंत जबाबदारी म्हणतो, असे संजय राऊत म्हणतात. आता आमच्या पक्षाची चुकुन यादी आली आहे, त्यात शेकाप पक्षांच्या संबंधित जागा आहेत. त्यांच्याशी आमची चर्चा सूरू आहे. काही राष्ट्रवादी पक्षाची आणि काँग्रेस पक्षाच्या जागा आहेत, त्यांच्याशी आमची चर्चा सूरू आहे,असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे शिवसेना युबीटीने जाहीर केलेल्या यादीमुळे काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. 

महाविकास आघाडीत 85, 85, 85 चा फॉर्म्युला ठरला आहे. आणि 18 जागा या शेकाप, कम्युनिस्ट, समाजवादी पार्टी या मित्रपक्षांसाठी सोडल्या असून त्यांच्याशी उद्या आम्ही चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, असा विश्वास देखील नाना पटोलेंनी व्यक्त केला.  

    follow whatsapp