Ajit Pawar: अजितदादा म्हणालेले, 'मी बारामतीतून निवडणूक लढवणार नाही!', पण आज यादीत पहिलं नाव!

मुंबई तक

• 09:43 PM • 23 Oct 2024

Ajit Pawar Baramati Vidhansabha: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, अजित पवार हे म्हणाले होते की, त्यांचा खासदार निवडून आला नाही तर ते बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत. मात्र, आज (23 ऑक्टोबर) राष्ट्रवादीच्या यादीत अजित पवार यांचंच नाव पहिलं होतं.

अजितदादा म्हणालेले, 'मी बारामतीतून निवडणूक लढवणार नाही!'

अजितदादा म्हणालेले, 'मी बारामतीतून निवडणूक लढवणार नाही!'

follow google news

बातम्या हायलाइट

point

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीतच अजित पवारांचं नाव

point

अजित पवार म्हणालेले बारामतीतून विधानसभा लढणार नाही

point

बारामती विधानसभेत काका विरुद्ध पुतण्या असा सामना?

Ajit Pawar Baramati: बारामती: 'माझी बारामतीकरांना विनंती आहे की, आम्ही ज्या उमेदवाराला खासदारकीसाठी उभं करू त्याला तुम्ही विजयी केलं पाहिजे. तर मी पुढे विधानसभेला उभा राहील. खरं सांगतो.. मी नाही तर खुशाल... तुम्ही जर मला साथच देणार नसतील तर मला प्रपंच आहे. मी कशाला यात पडू..' असं विधान अजित पवार यांनी लोकसभा निवडणूक 2024 च्या प्रचारादरम्यान बारामतीमधील एका जाहीर सभेत केलं होतं. असं असताना आज (23 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसची जी यादी जाहीर झाली त्यात अजित पवार यांचं पहिलं नाव असल्याचं समोर आलं. 

हे वाचलं का?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना तिकीट देऊन सुप्रिया सुळेंविरोधात उभं केलं होतं. त्यावेळी अजित पवारांनी सुनेत्रा पवारांसाठी एका जाहीर सभेत नेमकं काय भाषण केलं होतं आणि विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत नेमकं काय म्हटलं होतं हे आधी आपण जाणून घेऊया.

हे ही वाचा>> Ajit Pawar Candidates List: अजितदादांचा मोठा डाव, NCP ची पहिली यादी आली समोर

'…तर मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही', अजित पवार पाहा काय म्हणालेले

'एकंदरीत ही परिस्थिती आहे. काही जणं भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. काही जण आणखी काही सांगतील. मी आपल्याला सांगतो की, बारामतीकरांना मी उभ्या केलेल्या उमेदवाराला निवडून द्यावं लागेल. कारण आज या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व मी करतोय. राज्यात देखील मी पुढाकार घेतोय..'

'माझी तुम्हाला विनंती आहे की, शेवटी माझ्या विचाराचा खासदार हा चांगल्या मताधिक्याने आला पाहिजे.'

'कामामध्ये आजच्या घडीला माझी बरोबरी करणारा कोणी नाही.. पण तुम्ही मला साथ दिली पाहिजे. मी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला कार्यकर्ता आहे.. मी पण शेतकरी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही.'

'माझी बारामतीकरांना विनंती आहे की, आम्ही ज्या उमेदवाराला खासदारकीसाठी उभं करू त्याला तुम्ही विजयी केलं पाहिजे. तर मी पुढे विधानसभेला उभा राहील. खरं सांगतो.. मी नाही तर खुशाल... तुम्ही जर मला साथच देणार नसतील तर मला प्रपंच आहे. मी कशाला यात पडू..'

 

'कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला आता निर्णय घ्यायचा आहे. कारण मी इतकं जर काम करुन.. कारण वेगवेगळे मान्यवर येतील, भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला भावनिक व्हायचंय की, तालुक्याचा चाललेल्या विकासाची गती अशीच ठेवायची आहे? हे तुम्ही ठरवायचं आहे.'

हे ही वाचा>> Mahayuti : अजित पवारांमुळेच महायुतीला धोका? काय आहे राजकीय अर्थ?

'तुम्ही म्हणाल की, अजित तू फक्त बोलतोय.. पण उमेदवार कोण? ते तर सांग.. उमेदवार जोपर्यंत आमची महायुती एकत्र बसून कुठल्या जागा कोणा-कोणाला हे ठरवत नाही तोपर्यंत मला उमेदवार जाहीर करता येत नाही. ज्यांना माझ्यासोबत राहायचंय त्यांनी खुलेपणाने राहा.. दबावाने कोणी बरोबर राहू नका.. पण पुढे कधी तरी त्यांना अजित पवारची गरज लागेल.. तेव्हा त्यांना सांगतो कसा आहे अजित पवार.. तेव्हा काय सोडणार नाही..' असं अजित पवार हे 17 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या जाहीर सभेत बोलले होते. 

बारामतीत काका विरुद्ध पुतण्या?

दरम्यान, तेव्हापासूनच बारामतीमध्ये पवार वि. पवार असा सामना सुरू झाला. आता विधानसभा निवडणुकीत देखील असाच सामना होण्याची चिन्ह आहेत. कारण बारामतीत आता अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार हे उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारामतीत आता काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. 

    follow whatsapp