Uddhav Thackeray Bag Check : अधिकाऱ्यांना काही कळतं की नाही? उद्धव ठाकरेंची बॅग चेक करण्यावरुन राज ठाकरे काय म्हणाले?

मुंबई तक

13 Nov 2024 (अपडेटेड: 13 Nov 2024, 03:43 PM)

Uddhav Thackeray Bag Check: उद्धव ठाकरे यांची बॅग निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासल्याचे दोन प्रसंग घडले.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरेंची बॅग तपासली

point

औसा आणि वणीमध्ये हेलिकॉप्टरची तपासणी

point

राज ठाकरे या घटनांवर काय म्हणाले?

Uddhav Thackeray Bag Check: उद्धव ठाकरे यांची बॅग निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासल्याचे दोन प्रसंग घडले. त्यावरुन राज ठाकरे यांनी त्यांना टोला मारला. राज्यात विधानसभा निवडणुकांचं मतदान अवघ्या काही दिवसांवर आलं आहे. जसजसा मतदानाचा दिवस जवळ येतोय, तसा प्रचाराचा जोरही वाढतोय. यंदा राज ठाकरे यांनी सुद्धा या निवडणुकीत आपले उमेदवार उतरवले आहेत. अशातच विक्रोळीमधील मनसेचे उमेदवार विश्वजीत ढोलम यांच्यासाठी काल राज ठाकरे यांनी सभा घेतली. या सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Sharad Pawar : "भूजबळांनी मर्यादा ओलांडल्या...", शरद पवारांनी दंड थोपटले, येवल्यात तुफान बरसले

 

उद्धव ठाकरे यवतमाळ दौऱ्यावर असताना वणी येथील हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरताच उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांना सवाल करत स्वत: व्हिडीओ घेत तो प्रसिद्ध केलं. त्यानंतर पुन्हा एकदा लातूरमध्ये औसा विमानतळावर उद्धव ठाकरेंची बॅग तपासली. त्यावरुन राज ठाकरे यांनी फटकेबाजी केली. उद्धव ठाकरे यांना लक्ष करत राज ठाकरे म्हणाले, "व्हिडीओ काढतायत...हेलिकॉप्टरमध्ये बॅगेची तपासणी करताना... त्या निवडणूक आयोगाच्या लोकांना तरी काही कळतं की नाही? कुणाची बॅग तपासायची, कुणाची नाही तपासायची? ज्याच्या हातून पैसे सुटत नाही, तो बॅगेत पैसे घेऊन जाणारे का? अनेक शिवसैनिकांना विचारा, उमेदवारांना विचारा... पैसेच सुटत नाही हातातून, काय तपासताय बॅगेत?" असे सवाल करत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

हे ही वाचा >>Sharad Pawar : "भूजबळांनी मर्यादा ओलांडल्या...", शरद पवारांनी दंड थोपटले, येवल्यात तुफान बरसले

 

राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक सभेतून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना दिसत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत केलेल्या युतीवरुन ते उद्धव ठाकरेंना धारेवर धरत आहेत. बाळासाहेब ठाकरेंची हयात ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात गेली, त्यांच्यासोबत जाऊन तुम्ही मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात घालून घेतली. जातीपातीमध्ये विष कालवणारे शरद पवार आणि वर्षा गायकवाड शिवरायांची मूर्ती हातात देत असताना त्याकडे पाहून दुर्लक्ष करणाऱ्या राहुल गांधींसोबत तुम्ही गेलात असं म्हणत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मंचावर बाळासाहेब ठाकरेंचं नावही ते घेत नाहीत, त्यांच्यासोबत हा माणूस जाऊन बसतो असं म्हणत राज ठाकरेंवर निशाणा साधला. 

    follow whatsapp