Sanjay Raut on Raj Thackeray : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राज ठाकरे यांना भाजप सोबत घेणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि भाजपवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांना खेळवलं जातंय, राज ठाकरे भाजपच्या हातातलं खेळणं झालंय असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे आणि आमचे विचार जुळतात, आम्हाला त्यांना सोबत घेण्यात रस, पालिका निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे त्यांना सोबत घेऊन असं देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले होते. त्यावरुन संजय राऊत यांनी निशाणा साधला.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यातून हे स्पष्ट झालं आहे की, राज ठाकरे हे भाजपने सांगितल्याप्रमाणे भूमिका घेत आहेत. देवेंद्र फडणवीस ठरवत आहेत, त्यांनी काय करायचं. एकीकडे मुंबईत मराठी बोलायचं नाही, गुजराती-मारवाडी बोला असा भाजपचा आग्रह आहे, मराठी लोकांवर दबाव आहे आणि त्याच भाजपचं नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांनी काय भूमिका घ्यावी हे ठरवत असतील तर राज ठाकरेंनी त्याबद्दलची भूमिका जाहीर केली पाहिजे. आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आमची उद्धव ठाकरेंची शिवसेना लढत राहील असं संजय राऊत म्हणाले आहेत.
हे ही वाचा >>Ajit Pawar : अजितदादांना मोठा दिलासा, आयकर विभागानं मुक्त केली जप्त मालमत्ता
अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांची प्रॉपर्टी मुक्त केली जाते, त्यांना वॉशिंग मशिनमध्ये टाकून तुम्ही प्रॉपर्टी मोकळ्या केल्या. हाच आपला भ्रष्टाचाराचा झिरो टॉलरन्स आहे असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. अजित पवार यांचं अभिनंदन करतो, ते फार अस्वस्थ होते, तणावाखाली होते, हजारोकोटींची प्रॉपर्टी जप्त केल्यानं त्यांना पक्ष सोडावा लागला, वडिलांसमान काकांच्या पाठीत खंजीर खुपसावा लागला. पण आज त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल, त्याबद्दल आम्हाला आनंद आहे असं राऊत म्हणाले. तसंच ते पुढे म्हणाले की, "देशातील इतर लोकांचीही जप्त संपत्ती अभ्यास करुन मोकळी करा, त्यांना भाजपमध्ये जायला भाग पाडू नका. एकनाथ शिंदे, अजित पवार, एकनाथ शिंदे यांनीही यासाठीच पक्ष सोडला. आता नवाब मलिक यांचीही संपत्ती मुक्त होणार."
हे ही वाचा >>Manoj Jarange : मनोज जरांगे यांचं सरकारला नवं अल्टीमेटम, इशारा देताना महायुतीकडून अपेक्षाही केली व्यक्त
मला तुरूंगात पाठवण्यात आधीच माझ्यावर दबाव होता की, तुम्ही पक्ष सोडा, उद्धव ठाकरे यांना सोडा असं सांगितलं जात होतं. ईडीने माझं राहतं घर जप्त केलं, वडिलोपार्जित 40 गुंठे जमीन जप्त केली. असं दाखवलं की, मनीलॉन्ड्रींगमधून संपत्ती घेतली, सेशन कोर्टानं सगळे आरोप उडवून लावले असं म्हणत संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय यंत्रणांवर निशाणा साधला.
ADVERTISEMENT