Sharad Pawar : "भूजबळांनी मर्यादा ओलांडल्या...", शरद पवारांनी दंड थोपटले, येवल्यातलं भाषण जसच्या तसं वाचा

मुंबई तक

13 Nov 2024 (अपडेटेड: 13 Nov 2024, 01:16 PM)

Sharad Pawar on Chhagan Bhujbal: एखाद्या माणसाने किती चुकीची कामं करावीत याला मर्यादा असते असं म्हणत शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना लक्ष केलं.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात सभा

point

शरद पवार यांचं तुफान भाषण

point

भुजबळांच्या चुकांचा पाढा वाचला

Yeola Assembly Elections 2024 : शरद पवार यांनी काल Chhagan Bhujbal यांच्या येवला मतदारसंघात सभा घेतली. या सभेतून शरद पवार यांनी भुजबळांवर सडकून टीका केली. एखाद्या माणसाने किती चुकीची कामं करावीत याला मर्यादा असते असं म्हणत छगन भुजबळ यांना लक्ष केलं. शरद पवार काल येवल्यात माणिकराव शिंदे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी जिंकण्याचा निर्धार करत माणिकराव शिंदे यांच्यामागे मी पूर्ण ताकदीनं उभं राहणार असल्याचं सांगितलं. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Maharashtra Election 2024: सत्तेचा सगळा गेम 'इथे' होणार चेंज.. कोण कुठे जिंकणार? संपूर्ण यादीच..

शरद पवार यांचा वादळी  प्रचार दौरा सध्या राज्यभर सुरू आहेत. यावेळी ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष करताना दिसत आहेत. येवल्यात भाषण करत असताना Sharad Pawar यांच्यावर घणाघात केला. Chhagan Bhujbal यांनी केलेल्या चुकांचा पाढा त्यांनी यावेळी वाचून दाखवला. "एखाद्या माणसाने चुकीची कामं, फसवेगिरी किती करावीत याला मर्यादा असतात, मात्र त्या सगळ्या मर्यादा छगन भुजबळ यांनी तोडल्या. ज्या व्यक्तिला सहकाऱ्यांबद्दल आस्था नाही, ज्या व्यक्तिला विचारांबद्दलची आस्था नाही, आज ती व्यक्ति तुमच्यासमोर मतं मागण्यासाठी येईल. अशा धोकेबाज लोकांना आम्ही पाठिंबा देणार नाही, हा निर्णय तुम्हाला घ्यायचाय. मी तुमच्या पाठीशी उभा आहे, आपण ही लढाई जिंकू, जिंकू, जिंकू!" असं म्हणत शरद पवार यांनी तुफान भाषण केलं.

 

भुजबळांनी बाळासाहेबांची टिंगल केली : पवार

 

"भुजबळांना बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईचं महापौरपद दिलं, त्यांना प्रतिष्ठा दिली, त्याच बाळासाहेब ठाकरेंशी त्यांनी संघर्ष करायचं ठरवलं आणि बाळासाहेब ठाकरेंचीच टींगल केली. त्यावेळी त्यांनी वेगळ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांची स्थिती वाईट होती, कारण बाळासाहेब ठाकरेंची टिंगल केल्यानं शिवसैनिकांच्या गंभीर प्रतिक्रिया येत होत्या, त्यामुळे कदाचित त्यांच्याकडून आपल्याला धडा शिकवला जाईल ही चिंता छगन भुजबळ यांच्या मनात होती. त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की, माझ्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. मला संरक्षण द्या, मला कुठतरी लपवा असं म्हणत छगन भुजबळ यांनी आमच्याकडे मदत मागितली आणि आम्हाला खरं वाटलं म्हणून आम्ही नागपूरला त्यांची व्यवस्था केली, पोलीस सुरक्षा दिली. थोडं हळूहळू शांत झालं, तेव्हा आम्ही त्यांना विधानसभेला तिकीट दिलं. तिथे यश मिळालं, दुसऱ्यांदा पुन्हा त्यांना विधान परिषदेवर घेऊन, विरोधी पक्षाचं नेतृत्व दिलं, पुन्हा नंतर आमदार केलं. या माणसाचा उपयोग करुन घ्यायचा म्हणून त्यांना मोठी जबाबदारी दिली. नंतर महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांना मंत्री केलं, मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी काहीतरी उद्योग करुन ठेवले, त्याचा परिणाम म्हणून त्यांना ते पद सोडावं लागलं आणि तुरुंगात जावं लागलं. त्यांना भेटायला जायला कुणी तयार नव्हतं. तेव्हा माझी मुलगी काही सहकाऱ्यांना घेऊन त्यांना भेटायला गेली. त्यांना भेटून त्यांना धीर दिला. तुम्ही पुन्हा माझ्या शब्दाची किंमत ठेवून त्यांना विधानसभेवर निवडून दिलं. त्यांना गृहमंत्रीपद दिलं, दुर्दैवानं तिथेही त्यांनी चुका केल्या. त्यांना मंत्रिपद सोडावं लागलं, पण पुन्हा अशी चूक करणार नाही असं ते म्हणाले आणि आम्ही विश्वास ठेवून आम्ही सगळं विसरलो. पुढच्या काळात त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं, पण नंतर त्यांनी काही वेगळी कामं करण्यास सुरूवात केली आणि आम्हाला त्याचा फटका बसला आणि आमचं सरकार आलं नाही. त्यानंतर आम्ही उद्धव ठाकरेंसोबत सरकार स्थापन करण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्यावेळीही त्यांना मंत्रिपद दिलं. पण आमच्या सहकाऱ्यांनी फाटाफूट करुन वेगळा पक्ष काढला. मला आठवतंय ही स्थिती मला समजली, तेव्हा मी ठरवलं की पुन्हा एकदा लोकांना सोबत घेऊ, पक्ष बांधणी करु. एक दिवस भुजबळ माझ्याकडे आले, मला म्हणाले त्यांची समजूत काढली पाहिजे, मी त्यांची समजूत काढायला जाऊ का? पण भुजबळ गेले आणि ते परत आलेच नाहीत. दुसऱ्या दिवशी त्यांनी शपथ घेतली. एखाद्या माणसाने चुकीची कामं, फसवेगिरी किती करावीत याला मर्यादा असतात, मात्र त्या सगळ्या मर्यादा छगन भुजबळ यांनी तोडल्या. ज्या व्यक्तिला सहकाऱ्यांबद्दल आस्था नाही, ज्या व्यक्तिला विचारांबद्दलची आस्था नाही, आज ती व्यक्ति तुमच्यासमोर मतं मागण्यासाठी येईल. अशा धोकेबाज लोकांना आम्ही पाठिंबा देणार नाही, हा निर्णय तुम्हाला घ्यायचाय. मी तुमच्या पाठीशी उभा आहे, आपण ही लढाई जिंकू, जिंकू, जिंकू! येवल्याचं नावलौकिक देशात आहे, पण अशा परिसराचं नाव कुणामुळे खराब होत असेल तर त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय गत्यंतर नाही" असं म्हणत शरद पवार यांनी विजयाचा निर्धार केला.

 

    follow whatsapp