Ravindra Waikar : वायकरांच्या मेहुण्याकडे खरंच ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल होता का? निवडणूक आयोगाने दिलं उत्तर

प्रशांत गोमाणे

16 Jun 2024 (अपडेटेड: 16 Jun 2024, 09:28 PM)

Ravindra Waikar News : गुरव यांच्या जवळ असलेला फोन वायकर यांच्या नातेवाईकांकडे कसा सापडला? हा चौकशीचा भाग आहे. आणि गुरवने जो मोबाईल त्यांना दिला होता तो कोणत्या कंपनीचा होता हे पोलीसच सांगू शकतात. पण आम्ही त्याच्यावर एफआयआर केले आहेत आणि त्याला निलंबित केले आहेत, असे रिर्टनिग ऑफिसर यांनी सांगितले.

 state election commision returning officer press on ravindra waiker kin using mobile phone that unlock ev machine north west mumbai lok sabha election result 2024

रिर्टनिंग ऑफिसर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

follow google news

ECI Returning officer Press on Ravindra Waiker :  उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघात मतमोजणीच्या दिवशी रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकाने ईव्हीएम अनलॉक करणाऱ्या फोनचा वापर केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी एफआरआय नोंदवला होता. या घटनेचा धागा पकडत आता विरोधकांनी ईव्हीएममध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत रान पेटवले आहे. या घटनेनंतर आता राजकारण चांगलेच तापले आहे. असे असताना आता निवडणूक आयोगाने या सर्व घटनाक्रमावर आपलं म्हणणं माडलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या रिटर्निंग ऑफिसर वंदना सुर्यवंशी काय म्हणाल्या आहेत? हे जाणून घेऊयात. (state election commision returning officer press on ravindra waikar kin using mobile phone that unlock ev machine north west mumbai lok sabha election result 2024) 
 
 रिर्टनिंग ऑफिसर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, ईव्हिएम स्टॅड अलोन डिवाईस आहे, त्यात कुठलीही वायर आणि वायरलेस प्रोव्हिजन नाहीत. आणि ईव्हिएम अनलॉक करायला ओटीपी लागत नाही. त्यामुळे ही बातमी धांदात खोटी असल्याचे रिर्टनिंग ऑफिसर यांनी म्हटले आहे. ही अत्यंत चुकीची बातमी आहे. कोणतेही तपासणी न करता बातम्या दिल्याबदद्ल आम्ही मिड डे वर्तमानपत्राला नोटीसीही बजावली आहे. सेक्सन 499  बदनामी आणि 505 अफवा पसरवल्या प्रकरणी तक्रार दाखल केल्याचेही रिर्टनिंग ऑफिसरने म्हटले आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Ravindra Waikar : "कीर्तिकर EVM मध्ये 1 मताने जिंकले होते, नंतर...", वायकरांनी सोडलं मौन

इनकोअर ही सिस्टम आहे, जिथे डेटा वेबसाईटवर अपडेट केला जातो. त्याचा ईव्हीएमशी काही संबंध नसतो. ही ईसीआयची डेटा कंपायलेशन सिस्टम असते. त्या सिस्टमवर ओटीपी येण्यासाठी आपण काही लोकांना मोबाईलची परवानगी देतो. ही परवानगी आम्ही गुरवला दिली होती. ही परवानगी त्याच्या जवळ असलेल्या मोबाईल फोनला होती,असे रिर्टनिंग ऑफिसरने स्पष्ट केले.

तसेच गुरव यांच्या जवळ असलेला फोन वायकर यांच्या नातेवाईकांकडे कसा सापडला? हा चौकशीचा भाग आहे. आणि गुरवने जो मोबाईल त्यांना दिला होता तो कोणत्या कंपनीचा होता हे पोलीसच सांगू शकतात. पण आम्ही त्याच्यावर एफआयआर केले आहेत आणि त्याला निलंबित केले आहेत, असे रिर्टनिग ऑफिसर यांनी सांगितले. 

    follow whatsapp