Thane Crime News : ठाण्यामध्ये सात वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी रमेशकुमार रामरक्षा जैस्वाल (20) असं आरोपीचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीने सात वर्षांच्या मुलीला चॉकलेट आणि आईस्क्रीमचं आमिष दाखवलं, त्यानंतर मीरा रोड परिसरातच असलेल्या एका इमारतीच्या छतावर चिमुकलीला घेऊन गेला. तिथे रात्रीच्या वेळी आरोपीने चिमुकलीवर अत्याचार केला. 3 नोव्हेंबररोजी आरोपी रमेशकुमार जैस्वालने हे दुष्कृत्य केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Amit Shah : "आता आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पण निवडणुकीनंतर...", अमित शाह 'हे' काय बोलून गेले
पीडितेच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर भारतीय दंड संहितेच्या कलम 64, 65(2), 74 आणि POCSO कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आणि सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या दृष्यांनुसार आरोपी ठाणे जिल्ह्याच्या बाहेर फरार झाल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी माहिती घेतली असता, तो उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपीचं लोकेशन शोधून तिथे जाऊन आरोपीला अटक केली.
काही दिवसांपूर्वीच ठाण्यात 17 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना तात्काळ अटक केली होती. माजिवडा परिसरातील 6 ऑक्टोबररोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला होता. अल्पवयीन मुलगी भावासोबत घरी जात असताना चार आरोपींनी दोघांना चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावून घेत हा प्रकार केला होता.
हे ही वाचा >>Raj Thackeray Exclusive : 'माझी पाचवी निवडणूक, तुमची पहिली...', CM शिंदेंना राज ठाकरेंनी थेट सुनावलं!
त्यानंतर आरोपींनी भावाला पळवून लावलं आणि मुलीवर अत्याचार केला होता. तसंच या घटनेबद्दल कुणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दोघांना दिली होती. त्यानंतर घरी आल्यानंतर पीडितेने घडलेला प्रकार कुटुंबाला सांगितला. कुटुंबीयांनी कापूरबावडी पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार केली होती.
ADVERTISEMENT